जनरल मोटर्स कंपनीने दिलेल्या ले-ऑफ बाबत कामगार कार्यालयाची कारणे दाखवा नोटीस

पुणे : तळेगाव येथील जनरल मोटर्स (General Motors) कंपनीने कामगारांना ले-ऑफ (lay-off) दिल्यानंतर कामगार उपायुक्त कार्यालय पुणे यांनी याची दखल घेऊन कंपनीला ले-ऑफ दिल्याबाबत कारणे दाखवा नोटीस दिली आहे. याबाबत कामगार संघटनेने देखील कंपनीने दिलेल्या ले-ऑफ बदल हरकत घेतलेली होती.

जनरल मोटर्स कंपनी ने १६ एप्रिल २०२१ आणि दिनांक १९ एप्रिल २०२१ नुसार आस्थापनेतील एकूण १५७२ कामगारांना १ मे २०२१ पासून ले-ऑफ दिला आहे औद्योगिक विवाद अधिनियम १९४७ च्या कलम २५ नुसार कामगारांना ले-ऑफ देण्यापूर्वी शासनाची पूर्वपरवानगी घेतलेली नाही असे नमूद करून कामगार उपायुक्त कार्यालय पुणे यांनी जनरल मोटर्स कंपनीला कारणे दाखवा नोटीस दिली आहे.

जनरल मोटर्स कंपनीने कामगारांना ले-ऑफ दिल्यानंतर कामगार संघटनेने हा दिलेला ले-ऑफ बेकायदेशीर असून या विरुद्ध कायदेशीर कारवाई अशी मागणी कामगार कार्यालय व शासनाकडे केली होती. 

यापूर्वी कंपनीने क्लोजर अर्ज कामगार विभागाकडे दिलेला होता तरी तो नाकारला गेला असून या क्लोजर चे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

संबंधित बातम्या :

कंपनीने दिलेले ले-ऑफ बेकायदेशीर - जनरल मोटर्स कामगार संघटना : by कामगार नामा April 20, 2021

जनरल मोटर्स कंपनीने कामगारांना दिला ले-ऑफ : by कामगार नामा April 18, 2021

शासनाने जनरल मोटर्स कंपनी क्लोजर पुनरावलोकन अर्जवरती (Closure Review Application) औदयोगिक न्यायालय कडे जाण्यास सांगितले : by कामगार नामा March 21, 2021

कामगार मंत्री यांनी जनरल मोटर्स कंपनी 'क्लोजर अर्ज' नाकारला, हजारो कामगारांना दिलासा : by कामगार नामा January 19, 2021

जनरल मोटर्स कामगारांचा रोजगार कायम राहिला पाहिजे हि शासनाची जवाबदारी : by कामगार नामा December 27, 2020

जनरल मोटर्स कंपनीतील चार हजार कामगारांवर कोसळणार बेरोजगाराची कुऱ्हाड : by कामगार नामा December 20, 2020