General Motors Company, Talegaon, Pune laid off 1419 workers on Friday under Section 25C of the Certified Standing Order and ID Act, 1947.
पुणे : तळेगाव येथील जनरल मोटर्स कंपनीने सर्टिफाईड स्टँडिंग ऑर्डर आणि औद्योगिक वाद अधिनियम १९४७ कलम २५ सी नुसार शुक्रवारी १४१९ कामगारांना ले ऑफ देण्यात आला. कंपनीने सर्व १४१९ कामगारांना ईमेलद्वारे नोटीस पाठविली असून त्याची प्रत शुक्रवारी जनरल मोटर्स कर्मचारी संघटनेचे सचिव व अध्यक्ष यांना देण्यात आली. कंपनीने संबंधित नोटीस गेट वरती लावली असून पुढील आदेश होईपर्यंत ती लागू राहिल असे नोटीसमध्ये नमूद केले आहे.
तथापि कामगारांना औद्योगिक विवाद कायदा १९४७ च्या कलम २ सी नुसार नुकसान भरपाई मिळण्याचा हक्क आहे आणि त्यांना देय मोबदला देण्यात येईल, मूळ मासिक वेतन आणि महागाई भत्ताच्या ५०% देण्यात येणार आहे असेही नोटीस मध्ये नमूद केले आहे.
"कोविड १९ हि एक नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आम्ही योग्य प्राधिकरणांकडून कोणतीही पूर्वपरवानगी मागितली गेली नाही किंवा आयडी कायद्याच्या कलम २ एम नुसार परवानगीची आवश्यकता नाही" असे पत्रात म्हटले आहे.
कंपनी यामध्ये सांगते कि, दि.२० नोव्हेंबर २०२० रोजी तळेगाव प्लांट बंद करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची परवानगी मागण्यासाठी अर्ज (क्लोजर अॅप्लिकेशन) दाखल केला होता. परंतु क्लोजर अर्ज नाकारला गेल्यामुळे हा विषय मुंबई हायकोर्टामध्ये दाखल आहे.
संबंधित बातम्या :
जनरल मोटर्स कामगारांचा रोजगार कायम राहिला पाहिजे हि शासनाची जवाबदारी : by कामगार नामा December 27, 2020