आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया.प्रा.लि. (ArcelorMittal Nippon Steel India Limited) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : सणसवाडी येथील आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया.प्रा.लि. (ArcelorMittal Nippon Steel India Limited) कंपनी व्यवस्थापन आणि AM/NS कामगार संघटना यांच्यामध्ये त्रैवार्षिक वेतनकरार यशस्वीरित्या संपन्न झाला.

AM/NS कामगार संघटना, सणसवाडी ही राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाला संलग्न असून अध्यक्ष ॲड.श्री.किशोर ढोकले व उपाध्यक्ष श्री.राजू अण्णा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा वेतनकरार ऐतिहासिक व आनंदाच्या वातावरणात पार पडला.

कामगार प्रतिनीधी व कामगार यांनी गणपती बाप्पांना स्मरुण हा करार व्यवस्थापनाला दिला होता व व्यवस्थापनाने सकारात्मक भुमिका घेत मान्य केला.

 दि.1 ऑक्टोबर 2025 ते 30 सप्टेंबर 2028 त्रैवार्षिक करार अतिशय जल्लोषाच्या वातावरणात संपन्न झाला. रु.19,100/- तीनवर्षासाठी,वार्षिक एन्क्रिमेंट वेगळे,मेडिक्लिम सुविधा रु.4.5 लाख + रु.4.5 लाख बफर,GPA पॉलिसी 50 लाख,टर्म पॉलीसी 25 लाख,कायमस्वरूपी अपंगत्व फंड,फॅमिली गेट टुगेदर रु.1600/-,प्रतिवर्षी,फेस्टिवल ऍडव्हान्स रु.20,000/-,सेवानिवृत्ती रु.17,000/-, बोनस 8.33% व वेज कोड नुसार, 25 वर्षे सेवापूर्ती रु.4,000/-, कॅन्टीन सुविधा, बस सुविधा, SL मध्ये 1 ने वाढ,इ पदोन्नती पॉलिसी, व इतर सुविधा देण्यात आल्या.

या करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले व कामगारांनी फटाके वाजवून गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.व्यवस्थापनाचे देखील कमिटीने आभार व्यक्त केले आणि व्यवस्थापनाकडून कामगारांना शुभेच्छा देण्यात आल्या.

व्यवस्थापनाच्या वतीने C.E.0 श्री.हेमंत पांढरे, HR HEAD श्री.मुकूंद जागीरदार, श्री.दिपक निकुंभ, श्री.राजेश राजपूत, श्री.प्रकाश सुर्यवंशी, श्री. महेश साळुंके यांनी कामगार संघटनेच्या कमिटीला बरोबर घेऊन संघटनेचे अध्यक्ष श्री.तानाजी दरेकर, उपाध्यक्ष श्री.पंडित साठे, सचिव श्री.नवनाथ यनभर, उपसचिव श्री.उत्तम साकोरे, खजिनदार श्री.महेश टेमगिरे, उपखजिनदार श्री.गणेश शिंदें, श्री.कैलास मुंगसे, श्री.मनोहर शितोळे, श्री.उदय ढमाले, श्री.अरुण ठोंबरे यांनी यशस्वीरित्या पार पाडला.