मुंबई : तळेगाव,पुणे येथील जनरल मोटर्स कंपनी ने क्लोजर साठी केलेला अर्ज कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नाकारला आहे अशी माहिती कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आली.
यामुळे हजारो कामगारांना दिलासा मिळाला असून कामगार संघटनेने याबाबत शासन, कामगारांचा रोजगार वाचवण्यासाठी सहकार्य, मार्गदर्शन केलेले सर्वांचे ऋण मानले.
काय आहे प्रकरण :
जानेवारी २०२० मध्ये तळेगाव,पुणे येथील जनरल मोटर्स कंपनी ही चीन च्या ग्रेट वॉल मोटर्स या कंपनीला विकली. या मध्ये एकही कामगार ग्रेट वॉल मोटर्स या कंपनीमध्ये जाणार नाही असा परस्पर करार केला. या करारा संबंधी २९ जानेवारी २०२० रोजी उद्योगमंत्री यांच्या दालना मध्ये प्राथमिक बैठक झाली. त्यानंतर संघटनेने ४ फेब्रुवारी २०२० रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योग मंत्री, कामगार मंत्री यांना पत्रव्यवहार करून आपली हरकत याठिकाणी दाखल केली.
त्या नंतर २३ जून २०२० रोजी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री तथा कामगार मंत्री यांच्याकडे हरकत दाखल केली. तसेच संघटनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. व हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले.
या नंतर जनरल मोटर्स कंपनीने शासन दरबारी क्लोजर ला अर्ज केला आहे. या क्लोजर अर्जावरती निर्णय घेताना कामगार मंत्री यांनी सर्व बाबी समजावून घेऊन सदर अर्ज नाकारला.
कंपनी क्लोजर अर्ज नाकारणे कामगारांना दिलासा देणारे असले तरी, नवीन येणाऱ्या कंपनी मध्ये सर्व कामगारांचा रोजगार कायम राहावा याबाबत शासन, व्यवस्थापन स्तरावरून कार्यवाही होणे गरजेचे आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------
संलग्न बातम्या :
जनरल मोटर्स कामगारांचा रोजगार कायम राहिला पाहिजे हि शासनाची जवाबदारी
दि.२७ डिसेंबर २०२० by कामगार नामा
जनरल मोटर्स कंपनीतील चार हजार कामगारांवर कोसळणार बेरोजगाराची कुऱ्हाड
दि.२० डिसेंबर २०२० by कामगार नामा