कॉन्सेंट्रिक पंप्स पुणे प्रा. लि. (Concentric Pumps Pune Pvt. Ltd.) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : लोणीकंद येथील कॉन्सेंट्रिक पंप्स पुणे प्रा. लि. (Concentric Pumps Pune Pvt. Ltd.) कंपनी व्यवस्थापन आणि कॉन्सेंट्रिक कामगार संघटना यांच्यामध्ये वेतनवाढीचा करार दि. 24 सप्टेंबर 2026 रोजी यशस्वीपणे संपन्न झाला.

कराराची ठळक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे :

कालावधी : दि.1 एप्रिल 2026 ते दि.31 मार्च 2029 

वेतनवाढ : रु.16,500/-

वेतनवाढीचा लाभ : पहिले वर्ष :  50%, द्वितीय वर्ष :  25%, तिसरे वर्ष :  25%

वेतन फरक : दि.1 एप्रिलपासून 2026 ऑगस्ट महिन्यापर्यंतचा वेतनवाढीचा संपूर्ण फरक (Arrears) कामगारांना देण्यात येणार आहे.

बोनस - वर्षनिहाय लाभ : 
2025–26 - ₹40,000/-
2026–27 - ₹40,000/-
2027–28 - ₹45,000/-
2028–29 - ₹45,000/-
चार वर्षांत एकूण बोनस : ₹1,70,000/-

मेडिक्लेम : मेडिक्लेमची मर्यादा ₹ 2 लाखांवरून ₹ 3 लाख करण्यात आली.

Long Service Award : 
15 वर्षे सेवा — ₹ 15,000/-
20 वर्षे सेवा — ₹ 20,000/-
25 वर्षे सेवा — ₹ 25,000/-
30 वर्षे सेवा — ₹ 30,000 /-

पेट्रोल भत्ता व नवीन लाभार्थी : पेट्रोल भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली असून, नवीन 4 कामगारांना पेट्रोल भत्त्याचा लाभ सुरू करण्यात आला आहे.

नाईट शिफ्ट स्नॅक्स : नाईट शिफ्टमधील स्नॅक्स मध्ये वाढ करण्यात आली.

युनियनसाठी कपाटाची सुविधा : कामगार संघटनेच्या कार्यालयीन कामकाजासाठी युनियनला कपाटाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

GPA पॉलिसी : अपघातातील आर्थिक मदतीत वाढ
GPA पॉलिसीअंतर्गत अपघाताच्या प्रसंगी मिळणारी साप्ताहिक आर्थिक मदत ₹ 5,000/- वरून ₹ 15,000/- करण्यात आली आहे.
Salary Advance सुविधेत वाढ :
पूर्वी 2 कामगारांना दोन महिन्यांच्या पगाराइतका Salary Advance दिला जात होता. आता ही सुविधा वाढवून 3 कामगारांना दोन महिन्यांच्या पगाराइतका Salary Advance देण्यात येणार आहे.

वार्षिक सहल : नेहमीप्रमाणे दरवर्षी डिसेंबर महिन्यात वार्षिक सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे.

    करार यशस्वीपणे पार पाडण्यासाठी व्यवस्थापनातर्फे श्री.संजय डबीर - MD, सौ. सजनी नायर - HR Head, श्री.विजय हेकडे - GM, श्री.रमेश बागल - HR तसेच युनियनतर्फे अध्यक्ष श्री.सचिन गुंडाळ, उपाध्यक्ष श्री.अमित प-हाड, सरचिटणीस श्री.राहुल धावारे, सहसचिव श्री.राहुल आबनावे, खजिनदार श्री.शहाजी भंडारे, सदस्य श्री. ज्योतिबा  गाडीवड्ड, श्री. भरत खांडवे यांनी काम पहिले

पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पी डी सी बँक बँकेचे संचालक प्रदीप दादा कंद यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले तसेच श्रमिक एकता महासंघातर्फे प्रमुख सल्लागार श्री. मारुती जगदाळे व श्रमिक एकता महासंघाच्या सर्व पदाधिकारी व मार्गदर्शकांचे मोलाचे सहकार्य लाभले.