नगरपालिका व महानगरपालिका कंत्राटी कामगारांना राज्य विमा योजनेचे मिळणार संरक्षण (ESI coverage)

ESI coverage for casual and contractual employees of Municipal bodies in the States/UTs​

केंद्रीय कामगार राज्यमंत्री श्री संतोष गंगवार यांनी काल (१० जून) देशातील नगरपालिका, महानगरपालिका संस्थांमध्ये कार्यरत सर्व कंत्राटी, अस्थायी आणि नैमित्तिक कामगारांना कर्मचारी राज्य विमा कायदा १९४८ (Employees’ State Insurance Act, 1948 (ESI Act)) अंतर्गत व्याप्ती वाढविण्याच्या निर्णयाची घोषणा केली. यामुळे आत्ता देशभरातील विविध नगरपालिका आणि महानगरपालिका मध्ये कंत्राटी, अस्थायी आणि नैमित्तिक सेवेत असणाऱ्या कामगारांना कामगार राज्य विमा महामंडळ आरोग्य विमा संरक्षणाचे लाभ मिळणार आहे.

विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये नगरपालिकांमध्ये बरीचशी कामे ही कंत्राटी आणि नैमित्तिक कामगारांकडून केली जातात. हे कामगार नगरपालिका आणि नगर परिषदांच्या नियमित सेवेत नसल्याने त्यांना कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळत नाही. यावर उपाय म्हणून राज्य विमा कामगार राज्य विमा कायदा १९४८ (ESI) कायद्याची व्याप्ती ही कंत्राटी आणि नैमित्तिक कामगारांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे कामगार मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

या संबंधाने योग्य ती पावले राज्य व केंद्रशासित प्रदेशांना टाकून त्यांच्या कार्यक्षेत्रातील नगरपालिका व नगर परिषदा, महानगरपालिका मधील कंत्राटी कामगारांना ईएसआय (ESI) अंतर्गत सामावून घेण्यासाठी अधिसूचना जारी करण्याचे निर्देश कामगार राज्य विमा महामंडळ ला देण्यात आले आहेत. 

राज्यांकडून अधिसूचना निघाल्यानंतर संबंधित पालिकांमधील अस्थायी व कंत्राटी कामगारांना पीएसआय कायद्या अंतर्गत आजारपणाचे लाभ, प्रसूती लाभ, अपंगत्व लाभ, आश्रतींना लाभ आणि अंत्यसंस्काराच्या खर्चाचे लाभ मिळवता येऊ शकतील असे केंद्राने स्पष्ट केले आहे. शिवाय या कामगारांना एसआय अंतर्गत देशभरात पसरलेल्या १६० कामगार विमा रुग्णालय आणि १५०० हून अधिक दवाखान्यांमध्ये वैद्यकीय सेवांचा लाभ मिळविता येईल.