शासनाने जनरल मोटर्स कंपनी क्लोजर पुनरावलोकन अर्जवरती (Closure Review Application) औदयोगिक न्यायालय कडे जाण्यास सांगितले

मुंबई : तळेगाव,पुणे येथील जनरल मोटर्स कंपनी ने केलेल्या क्लोजर पुनरावलोकन अर्ज (Closure Review Application) वरती शासनाने दि.१९ मार्च रोजी औदयोगिक न्यायालय येथे जाण्यास सांगितले.

     यापूर्वी जनरल मोटर्स कंपनीने तळेगाव येथील प्लांट क्लोजर साठी दि.२० नोव्हेंबर २०२० रोजी अर्ज दिला होता त्यावरती शासनाने हा अर्ज दि.१८ जानेवारी २०२१ रोजी केलेली ऑर्डर नुसार क्लोजर अर्ज नाकारला होता. त्यावरती कंपनीने दि.२१ जानेवारी २०२१ रोजी पुन्हा क्लोजर पुनरावलोकन अर्ज (Closure Review Application) शासनाला सादर केला होता. यावरती दि.१९ मार्च २०२१ रोजी शासनाने हे क्लोजर प्रकरण करिता औदयोगिक न्यायालय कडे जाण्यास सांगितले.

शासनाने प्रथम क्लोजर अर्ज नाकारणे व नंतर औदयोगिक न्यायालय येथे जाण्यास सांगणे हि भूमिका कामगारांना दिलासा देणारी आहे का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.