EPFO ने ३१ डिसेंबर २०२० पर्यंत कोविड - १९ संबंधित ५६.७९ लाख क्लेम निकाली काढले आहेत. या दाव्यांनुसार ईपीएफओने १४,३१० कोटी रुपयांचे वितरण केले आहे. ईपीएफओच्या भागधारकांना ही आगाऊ रक्कम परत देण्याची गरज भासणार नाही. अशी माहिती द हिंदू ने दिली आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात देशव्यापी लॉकडाउन लागू करण्यात आले. त्यावेळी, केंद्र सरकारने ईपीएफओच्या सहा कोटीहून अधिक भागधारकांना त्यांच्या खात्यातून तीन महिन्यांच्या मूलभूत वेतन आणि महागाई भत्तेची रक्कम काढण्यास परवानगी दिली होती.
कोविड - १९ क्लेम वरून, देशातील कर्मचार्यांवर या साथीचा फार वाईट परिणाम झाला आहे. यावेळी, लोकांनी मोठ्या प्रमाणात रोजगार गमावले आहेत असे दिसते.