पिरंगुट : पिरंगुट (ता,मुळशी) औद्योगिक नगरी मधील मुबिया ऑटोमॅटिक कंपोनंट्स इंडिया प्रायव्हेट लि.(Mubea Automotive Components India Pvt Ltd) या नामांकित कंपनी मध्ये मुबिया एम्प्लॉईज युनियन व मुबिया व्यवस्थापन यांच्यामध्ये नुकताच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विक्रमी वेतन वाढीचा करार नुकताच संपन्न झाला आहे.यामुळे सर्व कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मुबीया संघटना व मुबीया व्यवस्थापन यांच्यामध्ये जवळपास एक वर्षापासून सुरू असलेल्या कराराच्या वाटाघाटी नंतर हा करार नुकताच संपन्न झालेला आहे हा करार दिनांक १/१/२०२५ ते ३१/१२/२०२७ या तीन वर्षासाठी करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे हा करार संपन्न झाल्यामुळे दिनांक १/१/२०२५पासून ३१/१२/२०२५पर्यंतचा वेतन वाढीचा सर्व फरक देण्याचे व्यवस्थापनाच्या वतीने मान्य करण्यात आले आहे.
या करारामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या वाढ पकडता हा करार रुपये १४७२५/- व दिलेल्या कामाची बेसलाइन पूर्ण करताच मिळणारा पंधराशे रुपये इन्सेन्टिव्ह पकडता रुपये १६२२५/- करण्यात आला आहे.
हा करार ७५ टक्के व २५ टक्के अशा दोन टप्प्यामध्ये करण्यात आलेला आहे तर या करारामध्ये सर्व कामगाराचा मेडिक्लेम एक लाख रुपयावरून तीन लाख रुपये करण्यात आलेला आहे
याचबरोबर या वेतन करारा नंतर २०२६ ते २०२७ या वर्षांमध्ये प्रत्येक वर्षाला दिवाळीला ३५०० रुपये बोनस देण्याचे देखील मान्य करण्यात आले आहे.
या विक्रमी वेतन करारावरती व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे सीईओ के.डी.सिंग.सीएफओ तपसपाल,मुबिया इंडिया एच.आर.हेड रमण गोवीत्रीकर,प्रोसेस हेड विकास मेहता,प्लांट मॅनेजर अविनाश दिवाण,फायनान्स मॅनेजर प्रेम किशन,प्रोसेस मॅनेजर महादेवन, सिनियर ऑफिसर विशाल होनकलसे यांनी सह्या केल्या तर कामगार संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष किरण नागरे, जनरल सेक्रेटरी कालिदास नगरे, जॉ.जनरल सेक्रेटरी विष्णू गोडांबे,खजिनदार हनुमंत नागरे, सदस्य सागर बराटे यांनी सह्या केल्या.
करार संपन्न होताच सर्व कामगारांच्या वतीने डीजेच्या तालावरती नाचत गुलालाची उधळण करीत आनंद उत्सव साजरा करण्यात आला.


