पुणे : कुरकुंभ येथील मोडेप्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Modepro India Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि पुणे जिल्हा मजदूर संघ (कामगार संघटना) यांच्यामध्ये दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी सौहार्दपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात वेतनवाढ व सेवा अटींबाबतचा तीन वर्षांचा करारनामा यशस्वीपणे करण्यात आला.
गेल्या अनेक महिन्यांपासून संघटना व व्यवस्थापन यांच्यात वेतनवाढ व इतर सेवा अटींसंदर्भात सातत्याने वाटाघाटी सुरू होत्या. या वाटाघाटींमध्ये संघटनेतर्फे जनरल सेक्रेटरी श्री. सचिन मेंगाळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली तसेच युनिट कामगार प्रतिनिधी धनंजय चव्हाण, रमेश गपाट, शुशील सुर्यवंशी व मोडेप्रो व्यवस्थापनाच्या वतीने ॲड प्रशांत पी. क्षीरसागर व ॲड अनिरुद्ध सानप (सर्वज्ञ लीगल असोसिएट्स) तसेच कंपनीचे वरिष्ठ अधिकारी श्री. सुभाष वाबळे आणि श्री. शैलेश देशमुख यांनी चर्चेत सक्रिय सहभाग घेतला.
सखोल चर्चेनंतर तीन वर्षांच्या करारासाठी कामगारांना ₹13,500/- इतकी भरघोस वेतनवाढ तसेच इतर अनेक सुविधा व लाभ मंजूर करण्यात आले. या करारामुळे उपस्थित कामगारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले असून, संघटनेच्या वतीने व्यवस्थापन तसेच व्यवस्थापनाचे कायदेशीर सल्लागार ॲड प्रशांत पी. क्षीरसागर व ॲड अनिरुद्ध सानप व व्यवस्थापन अधिकारी वाबळे व देशमुख यांचे आभार मानण्यात आले.
