मुंबई : महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाची तिसरी बैठक कामगार भवन, बांद्रा-कुर्ला संकुल, मुंबई येथे मंडळाचे अध्यक्ष गणेशभाऊ ताठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीच्या सुरुवातीस मागील बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता देण्यात आली. त्यानंतर खालील पाच उद्योगांमध्ये कार्यरत कामगारांना देण्यात येणाऱ्या किमान वेतनासंदर्भात सविस्तर चर्चा झाली:
१) सफाई व मेहतर कामगार
२) दुकाने किंवा व्यापारी अस्थापना कामधंदा
३) कारखाने अधिनियम १९४८ च्या कलम ८५च्या कक्षेत येणाऱ्या परंतु या अनुसूचीच्या यादीतील कोणत्याही उद्योगात न मोडणारे कारखान्यातील कामधंदा
४) ग्रामपंचायत वगळता कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या अंतर्गत रोजगार
५) बेकरी उद्योग
बैठकीत चर्चा करताना ग्राहक किंमत निर्देशांक, पायाभूत निर्देशांक, राहणीमान भत्ता यांचा अभ्यास करून व यापूर्वी निर्धारित करण्यात आलेला कालावधी या सर्व बाबींचा विचार करून वरील पाच उद्योगांसाठी नवीन किमान वेतन दर निश्चित करण्यात आले.
मंडळाने किमान वेतन निश्चित करताना उद्योजक आणि कामगार दोघांचाही समतोल राखण्याचा प्रयत्न करत सकारात्मक दृष्टीकोन ठेवला असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
अध्यक्षांच्या संमतीने घेतलेल्या ऐनवेळेच्या विषयात, राज्यातील किमान वेतन ठरवताना नवीन कामगार कायदे ,केंद्र सरकारचे नियम व राज्य सरकारचे नियमांचा अभ्यास करून आतापर्यत किमान वेतन कायम करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
मात्र, मंडळाचे अध्यक्ष यांनी नवीन सूचना मांडत असताना सर्व सदस्यांना आवाहन केले कि आपण राज्यातील संघटित असंघटित प्रकारच्या कामगारांच्या वेतनासंदर्भात वेतन विविध प्रकारच्या कामगारांशी प्राथमिक चर्चा करून अभ्यास करावा असे आवाहन करण्यात आले. अभ्यास करून वेतन संदर्भात शिफारस केली तर राज्यातील जास्तीत जास्त कामगारांना त्याचा लाभ होईल,त्यामुळे शासन व सरकार प्रति कामगार वर्गात सकारात्मक भावना निर्माण होईल असे बैठकीत नमूद करण्यात आले.
मंडळाच्या वतीने सल्लागार मंडळ यांच्या साठी अभ्यास दौरा आयोजित करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली
उपस्थित मान्यवर :
बैठकीस मंडळाचे सचिव व सहाय्यक कामगार आयुक्त अक्षय तुरेराव, मालक प्रतिनिधी म्हणून श्रीकांत देशमुख, चंद्रकांत महाडिक, संतोषराव देशमुख, बाबासाहेब दरेकर, कामगार प्रतिनिधी म्हणून माणिकराव पाटील,गणेशराव देशमुख , स्वतंत्र प्रतिनिधी म्हणून विरेंद्र ठाकूर, बिपिन गांधी, अध्यक्षांचे सल्लागार डॉ. अमित भोसले, जनसंपर्क अधिकारी अमितदादा कदम, तसेच कामगार विभागाचे उदय रासम, सुरज पाटील, दिप्ती कावळे, सायली शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

