EPFO खातेधारक करू शकतात नोकरी सोडण्याची तारीख अपडेट (Date of Exit)

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) ने खातेधारक यांच्यासाठी नोकरी सोडण्याची तारीख अपडेट (Date of Exit) सुविधा सुरु केलेली आहे, ज्याअंतर्गत खातेधारक स्वता: आपली नोकरी सोडण्याची तारीख अपडेट करू शकतात. याचा अर्थ EPFO ला ते स्वता: सांगू शकतील कि त्यांनी कधी संस्था / नोकरी सोडली. 

     पूर्वी कंपनीला माहिती अपडेट करण्याचा अधिकार होता आणि यामुळे खातेधारक पीएफ खाते अपडेट करण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत होता. जोपर्यंत कर्मचारी एकाच कंपनीत काम करतो तोपर्यंत त्यात काहीच अडचण नसते, परंतु जेव्हा कर्मचारी नोकरी सोडून दुसर्‍या कंपनीकडे जातो. तेव्हा बहुतेक प्रकरणांमध्ये जुन्या कंपनीची माहिती अपडेट करण्यास कर्मचारी यांना त्रास होत होता. कर्मचाऱ्यांची ही समस्या आता केंद्र सरकारने सोडविली आहे. नोकरी सोडण्याची तारीख अपडेट करण्याचा अधिकार आता खातेदारांना देण्यात आला आहे.

     नोकरी सोडल्याची तारीख (Date of Exit) अपडेट न झाल्यास आपण आपल्या ईपीएफ खात्यातून पैसे काढू शकत नाही किंवा आधीच्या कंपनीकडून खाते नवीन खात्यावर हस्तांतरित करू शकत नाही, 

(Date of Exit) ऑनलाइन अपडेट साठी प्रोसेस - 

  • www.epfindia.gov.in वेबसाईट ओपन करा.
  • Services मध्ये - For Employees वरती क्लिक करा.
  • Member UAN/Online services वरती क्लिक करा.
  • UAN आणि पासवर्डसह लॉग इन करा.
  • यानंतर Manage वर जा आणि Mark Exit वर क्लिक करा.
  • ड्रॉप डाऊन अंतर्गत Select Employment वरून PF Account Number निवडा.
  • यानंतर Date of Exit आणि Reason of Exit नोंदवा. 
  • नंतर Request OTP वर क्लिक करा आणि आधारशी लिंक्ड मोबाइल नंबरवर प्राप्त ओटीपी नोंदवा. यानंतर चेक बॉक्स सेलेक्ट करा.
  • शेवटी Update वर क्लिक करा आणि नंतर OK वर क्लिक करा. 
  • Date of Exit यशस्वीपणे अपडेट झाली आहे.