E.S.I.C स्कीम नेमकी काय आहे ? व फायदे काय ?


विनोद प्रल्हादराव फरकाडे
E.S.I.C मेंबर- रोजगार मंत्रालय भारत सरकार
तथा राज्य सचिव, महाराष्ट्र राज्य (E.S.I.C) विमाधारक कामगार संघटना

प्रस्तावना

E.S.I.C स्कीम नेमकी काय आहे ? व फायदे काय ? या स्कीम ची स्थापना कधी झाली व आमलात कधी आली ? आणि किती कामगारांवर कार्यरत असतांना त्याना कायदा लागू होतो व मालकाचा व कामगाराचा अशंदान निधी किती टक्के वाटा कपात होतो व त्याचे नेमके फायदे काय काय आहे व तोटे पण काय व कोण कोणत्या क्षेत्रात स्कीम लागू होते व परिवारात कोणा कोणला लाभ मिळू शकतो, इत्यादी माहिती.

    E.S.I.C कर्मचारी, राज्य विमा अधिनियम 1948 दि. 19/04/1948 ला तयार झाला व दि. 26/02/1952 ला लागू करण्यात आला (कर्मचारी राज्य विमा केंद्रिय) नियम 1950 ला संशोधन ? विनमय 1950 केंद्रिय कर्मचारी राज्य विमा अशा प्रकारे वरील तारखे प्रमाणे कायद्याची स्थापना झाली व अम्मलबजावणी झाली आणि 1952 ला रितसर भारत भर कायदा लागू झाला. मित्र हो विशेष सांगायचे झाले तर, प्रथम भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु हे I.P होते म्हणजेच विमाधारक कामगार होते.

    स्कीम कोणत्या क्षेत्रात सरकारी /निमसरकारी, त्या अस्थापना मध्ये कमीत कमी 10 कामगार कर्मचारी कार्यरत असायला पाहिले व सध्याची वेतन मर्यादा बेसीक डी.ए. 21 ते 25 हजारा पर्यंत आहे. (इतर भत्ते ग्राह्य धरल्या जात नाही.) कामगाराच्या पगारातुन निधी कशा प्रकारे कपात होतो. कामगाराच्या पगारातुन 0.75 व मालकाचा 3.25 पैसे (पुर्वी -1.75 व मालकाचा 4.75 असे 6.50 कपात होत होते) सध्या दोघांचे मिळुन फक्त 4 रु कपात होते.

    कामगारावर अवलंबुन असलेल्या किती लोकांना हितलाभ मिळते. त्याची आई, वडील व पत्नी मुले ते कितीही असो. स्वतःचे वडील हयात नसले तरच लहान भाऊ व बहीण समाविष्ट केल्या जाते. (खर्च किती प्रमाणात केल्या जातो हितलाभास पात्र असल्यास नो लिमीट, खर्च 1 रु पण लागत नाही.)

महत्वाचा मुद्दा :

     हितलाभास पात्र राहण्यासाठी कामगाराने कोणते नियम पाळावे लागतात 6 महिन्यात कामाचे कमीत कमी 78 दिवस भरले पाहिजे तर तो सुपर फॅसिलीटी साठी पात्र असतो. प्रायमरी व सेकंडरी केअर ट्रीटमेंट मिळू शकेल पण मोठ्या गंभीर आजारा करीता स्वतः व डीफेन्डेन्ट मेंम्बर सुध्दा वंचित राहू शकते.

     E.S.I.C चे कार्ड ई-पहेचान पत्र काढण्यासाठी काय करावे तुम्हाला काहीच करावे लागत नाही. पहिल्या दिवशी कामावर राजु होताच आधार कार्ड व फोटो, फॅमीली जॉईंट ग्रुप फोटो व्यवस्थापनाला देणे गरजेचे आहे व कंपनीची जबाबदारी आहे. कामावर घेताच रजिस्ट्रेशन करुन घेणे, ठेकेदार असो या कंपनी, त्यांची जबाबदारी चालू होते. त्यानंतर E.S.I.C ऑफीस कडुन टी. आय. सी. सात दिवसाच्या आत दिल्या जाते.

    उदा. एकदाचे वेळेवर रजिस्ट्रेशन कंपनीने या ठेकेदाराने केले की, काम करतांना घातपात झाला तरी तुम्ही सर्व हितलाभासाठी पात्र राहतात. जर कदाचित दुखत घटना घडली असता निधन झाले तरी तुमच्या ठरलेल्या पगाराच्या 90 टक्के पगाराप्रमाणे विधवा पत्नीला पेंशन स्वरुपात अश्रीत हितलाभ (मृत्यू दावा) मिळतो त्यासाठी मालकांनी वेळेवर रजिस्ट्रेशन करणे गरजेचे असते. लागलेला खर्च कंपनीने जरी केला तरी E.S.I.C रिफंड देते.

    वेळेवर रजिस्ट्रेशन करण्याचे फायदे जर तुम्ही घरुन कामावर जातांना तसेच काम संपल्यावर घरी जातांना अपघात झाला. डोळा निकामी झाला, पाय तुटला, कोणतेही अवयव निकामी झाले तरी डिसॅबीलीटी प्रमाणे डी. बी. पेमेंट कायमस्वरुपी मिळते. कदाचित रुग्नालयात अॅडमिट असतांना प्रथमोपचार चालू असतांना निधन झाले तरी, 90 टक्के पेंशन विधवा पत्नीला मिळते, विवाहीत नसला तर आई-वडीलांना 10 टक्के पेंशन मिळते.

    कामावर असतांना अपघात झाला तर कंपनीने वेळेवर अपघात फॉर्म ऑनलाईन भरावा व संबंधित E.S.I.C व संबंधित टायप हॉस्पीटलला किंवा जवळच्या कोणत्याही रुग्णालयात भरती करावे. खर्च E.S.I.C देतात. त्या रुग्णालयातून डीसचार्ज दिल्यावर संबंधित सेवा दवाखान्यात जाऊन पुढील वैद्यकिय रजा बरे होई पर्यंत वाढवुण मिळेल. व डॉक्टरांनी फिटनेस सर्टिफीकेट दिल्यावर रजेचा पगार E.S.I.C देतात. कंपनीने देण्याची आवश्यकता नाही.

    महिलांसाठी मेटर्निटी बेनिफीट डिलेव्हरी करीता टोटल सहा महिने पगारी रजा मिळतात. तसेच वैद्यकिय खर्चपण केला जातो. तुमच्या त्रासा प्रमाणे म्हणजेच गरजे प्रमाणे रजा वाढवुण देऊ शकतात. कामावर रुजु झाल्यावर फिटनेस सर्टिफिकेट दिल्यावर E.S.I.C ऑफीस कडुन तुमच्या अकाऊंटवर रजेचा पगार जमा केला जातो. अशा प्रकारे मॅटर्निटी चे फायदे आहेत.

    E.S.I.C व E.S.I.S. मध्ये फरक काय E.S.I.C ही केंद्र सरकारची स्कीम आहे. E.S.I.S. हे राज्य सरकार सेवा देते पण फंड E.S.I.C च पुरवते. जर तुम्ही खाजगी रुग्णालयात उपचार घेतले असता संबंधीत सेवा दवाखान्यात प्रतिपुर्तीची बीले सादर करु शकता. ते झालेल्या खर्चाच्या 50 ते 60 टक्के मिळतात. पण सरकारी दवाखान्यात इलाज केल्यास पुर्ण खर्च मिळतो. तरी जेणे करुन E.S.I.C अंतर्गत टायप हॉस्पीटल मध्ये प्रथम उपचार घेण अतिउत्तम आहे.

    तोटे आपला वर्षानुवर्षे निधी कपात होतो पण जर आपण खाजगी रुग्णालयात जाऊन वेळोवेळी प्रथमोपचार घेत राहीलो व बीले सादर केले नाही तर आपला तोटाच आहे. आपण आजारी पडुन सुध्दा E.S.I.C च्या रजाच घेत नाहीत तर E.S.I.C च्या सुट्ट्यांचा पगार मिळणार नाही आणि कंपनी पण पगार देणार नाही. हा पण तोटाच आहे. त्यासाठी आपल्या कष्टाचा घामाचा पैशांचे मुल्य समजुन पुरेपुर फायदा घ्यावा. तोटा करुन घेऊ नये.