बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील योजनांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यात येणार; दोषींवर कठोर कारवाई – कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर

नागपूर : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील आर्थिक व्यवहारांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी विधानपरिषदेत (दि. १४ डीएसेम्बर) दिली.

    सदस्य अभिजीत वंजारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री फुंडकर म्हणाले की, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक सहाय्य तसेच अत्यावश्यक व गृह उपयोगी संच देण्यात येणाऱ्या योजनांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या असून यासंदर्भात स्पेशल ड्राईव्ह सुरू करण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये तपासणी करून अनियमितता आढळलेल्या प्रकरणांत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन असल्याने बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याची शक्यता तपासली जात असून दोषी अधिकारी किंवा व्यक्ती आढळल्यास कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे मंत्री फुंडकर यांनी दिली.