Envalior इंडिया प्रायव्हेट लिमि. (Envalior India Pvt.Ltd.) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : रांजणगाव एमआयडीसी येथील Envalior इंडिया प्रायव्हेट लिमि. (Envalior India Pvt.Ltd.) कंपनी व्यवस्थापन आणि राष्ट्रवादी संघटीत व असंघटीत माथाडी मजदूर संघ (युनिट – Envalior India Pvt. Ltd. Ranjangaon) यांच्या मध्ये वेतनवाढ करार दि.10 डिसेंबर 2025 रोजी संपन्न झाला.

कराराची वैशिष्ट्ये खलील प्रमाणे :-

करार कालावधी : दि.1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2029 (एकूण 4 वर्षे)

पगारवाढ: रु.21,500 (4 वर्षांसाठी)
वेतनवाढीचे टप्पे पुढीलप्रमाणे 
पहिल्या वर्षी - 50% 
दुसऱ्या वर्षी - 25% 
तिसऱ्या वर्षी - 15% 
चौथ्या वर्षी - 10% या प्रमाणे देण्याचे मान्य करण्यात आले.

फरक रक्कम : 8 महिन्यांचा फरक रु.88,000/- मिळणार

मेडिकल इन्शुरन्स : रु.100000 ची वाढ करून रु.3,00,000 + Corporate Buffer एवढा करण्यात आला.

रात्र पाळी भत्ता : रु.100 मध्ये रु.50 ची वाढ करून रु.150/- एवढा करण्यात आला.

हजेरी भत्ता : रु.1,200 मध्ये रु.300 ची वाढ करून  रु.1500/- एवढा करण्यात आला.

दिवाळी गिफ्ट : रु.2500 मध्ये रु.1500 ची वाढ करून रु.4000/- एवढा करण्यात आला.

युनिफॉर्म : 2 वर्षातून एकदा Jerkin व T-Shirt देण्यात येण्याचे मान्य करण्यात आले.

मागील करारा मधील सगळे मुद्दे चालू करारात समाविष्ट केले आहेत.

     करार वेळी व्यवस्थापन यांच्या वतीने  उदय शेट्टी – Site Director, संदीप जावळे – Site Manager, सुष्मिता मिश्रा – HR Head, नितीन पाठक – HR Manager, प्रफुल्ल भावसार – Production Manager, मोनाली तारी–कारभाल – IR/HR ऑफिसर तसेच संघटनेच्या वतीने  महेश पाटील – अध्यक्ष, प्रसाद भैय्या तनपुरे – कार्याध्यक्ष, महेंद्र यादव – युनिट अध्यक्ष, सागर फलके – युनिट उपाध्यक्ष, विशाल गरुड – युनिट सचिव, शंकर हडके – युनिट सहसचिव, सचिन  परकाळे – युनिट खजिनदार हे प्रतिनिधी उपस्थित होते.