सेंटॉर फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड (Centaur Pharmaceuticals Pvt Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : हिंजवडी येथील Centaur युनिटमध्ये भारतीय कामगार सेना या संघटनेचा त्रिवार्षिक करार यशस्वीरीत्या संपन्न झाला आहे. हा करार 1 एप्रिल 2025 ते 30 मार्च 2028 या तीन आर्थिक वर्षांसाठी लागू राहणार आहे. कंपनीवर मागील तीन वर्षांत USFDA मुळे आलेल्या आर्थिक बोजाचा विचार करून, हा करार अत्यंत शांततापूर्ण व सकारात्मक वातावरणात सर्व कामगारांच्या सहकार्याने पार पाडण्यात आला आहे.

या करारातील प्रमुख ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत -

1) वेतनवाढ : कामगारांना बँडनुसार किमान ₹10,500 ते कमाल ₹13,500 इतकी वेतनवाढ मंजूर करण्यात आली आहे. या एकूण वेतनवाढीपैकी 70% रक्कम 1 एप्रिल 2025 पासून देण्यात येणार असून उर्वरित 15% दुसऱ्या वर्षी व 15% तिसऱ्या वर्षी देण्यात येणार आहे.

2) बोनस : पुढील तीन वर्षांसाठी बोनसची रक्कम पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे —
पहिले वर्ष ₹18,000, दुसरे वर्ष ₹18,500 आणि तिसरे वर्ष ₹19,000. शासनाच्या बोनस नियमावलीनुसार यापैकी जी रक्कम जास्त असेल ती कंपनीकडून दिली जाणार आहे.

3) रजा धोरण (Leave Policy) : कामगार कायद्यानुसार रजा धोरण लागू करण्यात आले आहे. 240 उपलब्ध दिवस गृहीत धरून, 240 दिवसांमध्ये 16 किंवा त्याहून अधिक उपस्थिती असलेल्या कामगारांना प्रत्येक 20 दिवसांमागे 1 EL या प्रमाणे रजा मंजूर करण्यात आली आहे. एकूण EL रजांमध्ये किमान 4 दिवसांची वाढ होणार आहे. मात्र 240 दिवसांची उपस्थिती नसलेल्या कामगारांना EL रजा मिळणार नाही.

4) रात्र पाळी भत्ता : रात्र पाळी भत्ता वाढवून ₹30 प्रति दिवस करण्यात आला आहे.

5) मेडिक्लेम पॉलिसी : सध्याची Mediclaim पॉलिसी कायम ठेवण्यात आली असून गरज भासल्यास Policy Buffer Amount ही रक्कम Reimbursement पद्धतीने मंजूर केली जाणार आहे.

6) शैक्षणिक प्रोत्साहन : इयत्ता 10वी व 12वी मध्ये 80% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या कामगारांच्या मुलांना कंपनी धोरणानुसार प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार आहे.

7) हजेरी धोरण : नियमित उपस्थिती ठेवणाऱ्या कामगारांना वर्षअखेरीस सर्टिफिकेट तसेच कंपनी धोरणानुसार बक्षीस देण्यात येणार आहे.

8) पोस्टिंग धोरण : पोस्टिंग संदर्भातील धोरण करारामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे

    या करारामध्ये व्यवस्थापनाच्या अपेक्षांचाही समावेश करण्यात आला असून, त्या अपेक्षा काटेकोरपणे पाळण्याची हमी संघटनेने दिली आहे. सर्व कामगारांच्या हिताचा विचार करून व कंपनीच्या आर्थिक परिस्थितीचा सन्मान राखत, हा करार भारतीय कामगार सेनेने यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.

    भारतीय कामगार सेनेच्या वतीने सरचिटणीस, शिवसेना उपनेते डॉ रघुनाथ कुचिक यांच्या ने्तृत्वाखाली यशस्वी वेतनकरार संपन्न झाला करारपत्रावर मा अध्यक्ष खा अरविंदजी सावंत, कार्याध्यक्ष मा अजितदादा साळवी, सरचिटणीस डॉ रघुनाथ कुचिक युनिट अध्यक्ष रोहिदास गराडे, सचिन राजवाडे, पांडुरंग बलिप, ईश्वर जगताप, एकनाथ धवन, प्रविण चव्हाण तर कपंनी व्यवस्थापनाच्या वतीने प्रकल्प प्रमुख मा शशिकांत सोनजे, मनुष्यबळ विकास प्रमुख मा अल्पेश म्हात्रे, कु मनास्विनी होनराव, नितीन कदम यांनी स्वाक्षरी केल्य. प्रसंगी भारतीय कामगार सेना सहचिटणीस शुभम दिघे, तेजस गडसुंद, आबा यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते.