शासकीय मुद्रणालयीन कामगारांचे आंदोलन

राज्य शासनाच्या उद्योग विभागाच्या अखत्यारीत मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर आणि वाई येथील ८ मुद्रणालये असुन शासनाची सर्व महत्त्वाची छपाई कामे अहोरात्र सुरू असतात. सद्यस्थितीत या सर्व मुद्रणालयांत ४० टक्के तांत्रिक कर्मचारी पदे रिक्त आहेत. त्याचे दुष्परिणाम उत्पादनावर होतो आहेत. कार्यरत कर्मचाऱ्यांना मानसिक आणि शारीरिक ताण सहन करावा लागत आहे. कामगारांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्व प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी दिनांक १० आणि ११ जुलै रोजी सर्व कर्मचारी प्रमुख सल्लागार अविनाश दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली काळ्या फितीचे असंतोष आंदोलन करुन शासनाचा लक्षवेध करणार आहेत असे सरचिटणीस सुनील रासम यांनी कळविले आहे.

    सेवा प्रवेश नियमांअभावी भरती ठप्प असुन नविन सेवा प्रवेश नियम मागील २६ वर्षे शासन दरबारी प्रलंबित आहेत. तसेच विभागीय पदांचा आढावा गेली ४ वर्षे शासनाकडे धुळ खात पडून आहे. परिणामी कर्मचारी भरती करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.मुंबई , नागपूर आणि वाई येथील मुद्रणालय इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यांचा पुनर्विकास करताना संघटनेला विश्वासात घ्यावे अशी मागणी आहे.

   मागील २० वर्षात मोठ्या प्रमाणावर छपाई व इतर यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली परंतु जुनी यंत्रे मुद्रणालयातच भंगारात पडून आहेत. त्यामुळे कामगारांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्व प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी दिनांक १० आणि ११ जुलै रोजी सर्व कर्मचारी प्रमुख सल्लागार अविनाश दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली काळ्या फितीचे असंतोष आंदोलन करुन शासनाचा लक्षवेध करणार आहेत असे सरचिटणीस सुनील रासम यांनी कळविले आहे. सदर आंदोलनाची योग्य दखल घेऊन शासनाने त्वरित बैठक बोलावून प्रश्न सोडवावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अध्यक्ष राहुल कडु यांनी दिला आहे.