महिंद्रा अँड महिंद्रा सातपूर,नाशिक (Mahindra & Mahindra) येथे वेतनवाढ करार संपन्न

नाशिक : सातपूर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी व्यवस्थापन. महिंद्रा अँड महिंद्रा अंतर्गत कामगार संघटना. यांच्यात कामगार वेतन वाढ करारावर स्वाक्षरी झाल्या. नवीन वेतन करारानुसार कामगारांना  सरासरी दरमहा सोळा हजार पाचशे वेतनवाढ मिळणार आहे.  वेतनवाढ सेवा जेष्ठतेनुसार कामगारांना  होणार आहे. याशिवाय  कंपनी व्यवस्थापना तर्फे महिंद्रा अँड महिंद्रा एम्प्लॉईज  वेल्फेअर  फंडला अनुदान स्वरूपात  सात लाख रुपये.ऐवजी नवीन  वाढीव अनुदान मिळणार आहे.

     याशिवाय करारानुसार नवीन सेवा सवलती. व अन्य फायद्यांचा. भरघोस लाभ कामगारांना मिळणार आहे. कामगार संघटनेने  नवीन वेतन वाढ करारानुसार  आठ टक्के उत्पादन वाढवून देण्याचे मान्य केले आहे. कराराची मुदत  स्वाक्षरी झाल्यापासून साडेतीन वर्ष आहे.या कराराचे कामगारांनी स्वागत केले असून. गुलाल उधळून ढोल ताशांचा स्वरात आनंद व्यक्त केला आहे. कामगारांनी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची कंपनीतील व्यवस्थापकीय उपाध्यक्षांच्या कार्यालयापासून  ते कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत  वाजत गाजत मिरवणूक काढली. कंपनीचे उपाध्यक्ष चंद्रकांत धांडे  यांच्या दालनात वेतनवाढ करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.

     वेतन वाढ करारावर  कंपनी व्यवस्थापना तर्फे महिंद्रा ऑटोमोटो सेक्टर चे मॅन्युफॅक्चरिंग सीएमओ विनय खानोलकर, महिंद्रा अँड महिंद्रा नाशिक प्रकल्पाचे उपाध्यक्ष  चंद्रकांत धांडे, कामगार संबंध व कार्मिक विभागाचे उपाध्यक्ष संग्राम देशमुख, महिंद्रा प्रकल्पाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक आसन सरन, वाणिज्य महाव्यवस्थापक दिपक पाटील, महिंद्र नाशिक प्रकल्पाचे कार्मिक उपमहाव्यवस्थापक मोहन कुमार, वाणिज्य विभागाचे व्यवस्थापक पुष्कर सावरकर, उपमहाव्यवस्थापक दत्तप्रसाद घाटे, मनीष शेटे तर कामगार संघटनेचे अध्यक्ष नितीन जाधव, सरचिटणीस संजय घोडके, उपाध्यक्ष सुनील ताठे, चिटणीस जितेंद्र सूर्यवंशी, सहचिटणीस अजित थेटे, खजिनदार सुरज अहिरे, कमिटी मेंबर अमोहनिष कोर, कमिटी मेंबर व संतोष सावकार यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या .

नवीन वेतन वाढ करानुसार कामगारांना मिळणारे लाभ व फायदे असे -

  • कामगारांना सरासरी पगार वाढ सोळा हजार पाचशे रुपये.

  • नवीन वेतन वाढ करारामुळे  कामगारांना कमीत कमी पाच हजार रुपये  ते जास्तीत जास्त बावीस हजार रुपये. सेवाजेष्ठतेनुसार  नुसार वाढ होणार आहे.

  • कंपनी व्यवस्थापनाकडून  महिंद्रा अँड महिंद्रा एम्प्लॉईज  वेल्फेअर फंडासाठी आता नवीन करारानुसार  दरवर्षी सात लाख रुपये ऐवजी वाढीव अनुदान मिळणार आहे.

  • या अनुदानातून महिंद्रा अँड महिंद्रा वेल्फेअर  फंडातून कंपनीतील निधन झालेल्या कायम कामगाराच्या. कुटुंबीयांनी  कामगाराच्या मुलाला कंपनीत नोकरी लावायचा असेल तर, पाच लाख रुपये ऐवजी यापुढे सात लाख रुपये देण्यात येतील. मुलाला कंपनीत नोकरीस न लावल्यास सात लाख रुपये ऐवजी  दहा लाख रुपये आर्थिक मदत वेल्फेअर फंडातून देण्यात येईल.

  • दहा लाख रुपये सामायिक विमा अपघात पॉलिसी रक्कम. कामगारांच्या वेतनातून यापुढे न कापता नवीन करारानुसार  महिंद्रा अँड महिंद्रा वेल्फेअर फंडाला मिळालेल्या  अनुदानातील  कामगारांना फंडातून यापुढे भरण्यात येतील.

  • राज्य शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची वार्षिक वर्गणी प्रति कामगार पंधरा रुपये यापुढे वाढीव कंपनी रुपये अनुदानातून भरण्यात येईल 

  • प्रत्येक कामगारांला पावसाळी रेनकोट व थंडीत स्वेटर करिता यापुढे नवीन करारानुसार नऊशे रुपये ऐवजी कंपनीकडून दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत.

  • भारतीय श्रम मंत्रालयाच्या कामगार प्रशिक्षण वर्गाच्या. प्रत्येक प्रशिक्षणार्थी कामगारास खर्चासाठी दीड हजार रुपये  ऐवजी नवीन करारानुसार तीन हजार रुपये देण्यात येणार आहे. तसेच कामगार शिक्षकांना खर्चासाठी तीन हजार रुपये ऐवजी सहा हजार रुपये देण्यात येतील 

  • अर्जित रजा  ( पी एल ) साठवणूक मर्यादा एकशे तीस ऐवजी यापुढे एकशे पस्तीस होणार आहे.

  • आजारपणाची रजा साठवणूक मर्यादा सत्तर ऐवजी यापुढे पंच्याहत्तर ची मर्यादा नवीन करारानुसार करण्यात आली आहे.

  • नवीन करारानुसार  अर्जित रजा,आजारपणाचा रजा, किरकोळ रजा कंपनीला विकण्याची नवीन पद्धत सुरू करण्यात आली आहे.

  • ज्या कामगारांना नवीन वैयक्तिक मेडिक्लेम पॉलिसी काढायची आहे. अशा कामगारांना दरवर्षी वीस हजार रुपये आगाऊ उचल  रक्कम देण्यात येईल. व ती रक्कम समान हफ्ता स्वरूपात सहा महिन्यात पगारातून कपात करण्यात येईल.

  • पेंट शॉप मधील मधील पेंट  बूथ मधील पेंटर व सी ओ टू वेल्डिंग कामगारांना दर महा केमिकल अलाउन्स स्वरूपात दोनशे साठ रुपये देण्यात येणार आहेत.

  • एन वन वेतन श्रेणीचे ओटू वेतनश्रेणीत समाविष्ट झालेल्या नव कामगारांना एक इन्क्रिमेंट जास्त देण्यात येणार आहे.

  • वेतन श्रेणी तील डीए चा अकरावा शंभर खुला करण्यात आला आहे.

  • सेवानिवृत्त होणाऱ्या कामगाराच्या परिवारास सेवा निवृत्तीच्या दिवशी स्कॉर्पिओ  विभागात प्रत्यक्ष गाडी कशी बनते हे काम चालू असताना पाहण्याची संधी देण्यात येणार आहे.

  • कामगारांच्या कॅन्टीन मधील चहा, नाश्ता, जेवण गोड पदार्थ व मांसाहार यांची दरमहा पगारातून एकत्रित कपात  यापुढे नवीन करारानुसार दीडशे रुपये ऐवजी दोनशे पन्नास रुपये करण्यात आली आहे.

  • वेतन वाढ कराराच्या थकीत, रकमे पोटी प्रती कामगारास एक मे २०२५ पासून ४१% रक्कम कामगारांना मिळणार आहे..

  • कंपनीत कायम कामगारांच्या दुचाकी व चारचाकी वाहन करता स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात येईल.

  • कामगारांच्या कंपनी बसची दरमहा रक्कम कमी करण्यासाठी कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांनी एकत्रित काही निर्णय घेतले आहेत.

  • सर्वात कमी कालावधीत झालेला वेतन वाढीचा करार आहे.

     यावेळी कार्मिक व्यवस्थापन विभागाचे व्यवस्थापक विकास झिंजुर्डे, प्रसाद पंडित, गणेश वाकचौरे, स्वप्निल पाटील, महेश सूर्यवंशी, कामगार कल्याण अधिकारी प्रिया पुजारी, सोनीया दरेकर, महिंद्रा अँड महिंद्रा एम्प्लॉईज  वेल्फेअर सहचिटणीस पोपटराव  देवरे व दत्तू जाधव आदी उपस्थित होते.

    दरम्यान नुकतीच कामगार संघटनेची सर्वसाधारण सभा घेऊन सर्व कामगारापुढे करारा मसुद्याचे वाचन संघटनेचे अध्यक्ष एन डी जाधव, उपाध्यक्ष सुनील ताठे, चिटणीस जितेंद्र  सूर्यवंश, सहचिटणीस अजित थेटे यांनी वाचन केले. तसेच  खजिनदार सुरज अहिरे खर्चाचा ताळेबंद अहवाल कामगारांसमोर सादर केला. याच वेळी कामगार संघटनेचे माजी विभाग प्रतिनिधी व बडतर्फ कामगार दशरथ मुरलीधर शिंदे व बळवंत विष्णू बर्वे  यांना कामगार संघटनेच्या निधीतून संघटनेच्या नियमानुसार आर्थिक मदत द्यावी याबाबतची सूचना  विभाग प्रतिनिधी नरेंद्र पाटील यांनी मांडली. सूचनेला विभाग प्रतिनिधी संतोष रिपोर्टे यांनी अनुमोदन दिले  व सभेत सर्व कामगारांच्या आवाजी मतदानाने ठराव मंजूर झाला आहे  अशी ही माहिती  कामगार संघटनेचे सरचिटणीस  संजय घोडके यांनी दिली.