मुंबई : केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यामध्ये केंद्र सरकारने वाढ केली होती आता राज्य सरकारनेही त्याचे अनुकरण केले आहे. आता 4% अधिक महागाई भत्ता राज्य सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
1 जानेवारी 2024 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 46 टक्क्यांवरुन तो 50 टक्क्यांवर नेला आहे. हा महागाई भत्ता वाढ 1 जानेवारी 2024 ते दि. 30 जून 2024 पासूनच्या थकबाकीसह जुलै 2024 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. तसेच महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी आणि कार्यपध्दती आहेत त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.
संबंधित शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा 👇