नाशिक (दि.६ जानेवारी २०२३) : "महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ" नाशिक विभागातील कर्मचारी तथा राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेच्या विभाग कार्यकारणी व सदस्यांची ललित कला भवन सिडको येथे आढावा बैठक संपन्न झाली.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातील अर्धवेळ कर्मचाऱ्यांना पूर्ण वेळ करावे तसेच नोकरीवरील नेमणूक तारखेपासून ग्रॅज्युटी व पेन्शन लागू करावी या करिता शासनाने निर्णय घेण्यास उशीर लावल्यास संघटनेने न्यायालयातून न्याय मागावा असे बैठकीत एकमुखी ठराव करण्यात आला.
सन २००५ मध्ये नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे निवडप्रक्रिये बाबतचा अनियमिततेचा आक्षेप शासनाने मागे घ्यावा, या करिता कामगार मंत्री, उपमुख्यमंत्री यांचेकडे पाठपुरावा करणे तेथेही प्रतिसाद न मिळाल्यास मुख्यमंत्री महोदयांनी या वरिल विषयांवर बैठक लावनेचे आश्वासन दिले आहे त्याचा पाठपुरावा करणे.
राज्यात दहा वर्षात कामगार संख्या तीन पटीने वाढलेली असताना कामगार हितासाठी प्रत्येक औद्योगिक शहरातील कामगार कल्याण केंद्र वाढवण्या ऐवजी निम्या संख्येने कमी करण्यात आली असून हेड ऑफिस सोडले तर सगळ्या कामगार कल्याण केंद्राची दुर्दशा झाली असून त्या साठी सक्षम,बोर्ड अस्तित्वात यावे या करिता संघटनेचे अध्यक्ष श्री. यशवंत भाऊ भोसले यांनी सरकारकडे त्वरित आपला ठराव पाठवावा असे सदस्यांनी मांडले.
मंडळ कल्याण आयुक्तांनी नवीन आकृतीबंद मध्ये केंद्र सेवक, सहा.केंद्र संचालक,केंद्र संचालक, केंद्र महिला कल्याण सहाय्यिका, क. लिपिक या फिल्ड वरिल पदांच्या रिक्त जागांवर अर्धवेळ कर्मचाऱ्यांना स्थान दिले आहे का ? नसल्यास आकृतिबंधास हरकत नोंदवने.
विभागीय कार्यालय सातपूर येथे संघटनेच्या नामफलकाचे उदघाट्न मोठ्या जल्लोषात झाले. या आढावा बैठकीस मुंबई, जळगाव, धुळे, नाशिक येथून मोठ्या संख्येने राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेच्या सदस्यांनी सहभाग घेऊन उपस्थिती दर्शवली.
या बैठकीत श्री.बाळासाहेब आंधळकर, सूर्यकांत गोतपगार, नदीम शेख, भास्कर शिरोळे, चेतन दुरुगकर, अजय निकम, विकास पाटील, किरण पाटील, निवृत्ती भाईकर, संदिप चव्हाण, बबन वाघ, बाळासाहेब लांडगे, विजय पाटील, निलेश वाघ, कविता कासार, प्रिती पाटील, संजय पाटील, उज्वला अवघडे, शुभांगी नावडीकर, प्रतिभा एरम, सुरेखा बडगुजर या कार्यकारणी सदस्यांनी आपली मते मांडली.
राष्ट्रीय श्रमिक आघाडी नाशिक शहर कार्यकारणी चे संपर्क प्रमुख श्री सुनिल अहिरे, अनिल अहिरे, सुभाष बच्चे,सुनिल गायकवाड, दिपक पाटील व संदिप साळवे यांनी आमचे स्वागत केले.