कुठलेही पुर्व सुचना नोटीस न देता ३०० कामगारांची कंपनीने केली हक्कालपट्टी, जो पर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही व परत कामावर घेतले जात नाही तो पर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करू - कामगार नेते सुनिल शिंदे
पुणे : जेजुरी औद्योगिक एमआय डीसी येथील नामांकित किर्लोस्कर फेरेस कंपनीतील कामगारांवर संक्रात मात्र डोक्यावर असल्याचे चित्र आहे कामावरून कमी केल्याने कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे किर्लोस्कर फेरस कंपनीने कामगारांना कुठलीच पुर्व सुचना व नोटीस न देता कामगारांना कंपनीने कामावरून कमी केले आहे याचा निषेधार्थ व आपल्या हक्कासाठी हे कामगार जेजुरीच्या खंडेरायाच्या पायऱ्यांवर भिख मागो आंदोलन करून कंपनीच्या व्यवस्थापनाला देव सद्बुद्धी देवो असे साकडे या ३०० कामगारांनी घातली आहे असे वृत्त Pressmedialive.co.in या वृत्तसंस्थेने दिले आहे.
या सर्व कामगारांनी राष्ट्रीय मजदूर संघ या संघटनेचे सभासदस्य स्वीकारलेले आहे या सर्व कामगारांना योग्य मोबदला व इतर सवलती वेतन कायद्याप्रमाणे दिला जात नाही कायद्याप्रमाणे २१ दिवसाचे भरपगारी रजा दिल्या जात नाही राष्ट्रीय सण उत्सव सुट्ट्यांचा पगार दिले जात नाही कायद्याप्रमाणे ज्यादा कामाचा मोबदला व एक ही सुट्टी देण्यात येत नाही कामगारांचे पीएफ फंडाची रक्कम कायद्याप्रमाणे जमा केले जात नाही व अति आवश्यक ई एस आय सी चे पहचान कार्ड देण्यात अद्याप देण्यात आलेल्या नाही, कंपनीमध्ये कामगारांना सुरक्षित च्या दृष्टीकोनातून पुरेशी साधने दिलेली जात नाहीत.
या वेळी राष्ट्रीय मजदुर संघचे संस्थापक अध्यक्ष सुनिल शिंदे यांनी मार्गदर्शन करताना कामगार म्हणाले की किर्लोस्कर कंपनी हे जगविख्यात नावाची कंपनी आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत असणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापनाकडून अशा प्रकारची कृत्य होणे अतिशय निंदनीय बाब आहे वास्तविक पाहता या कंपनीने कामगार कायद्याचे पालन काटेकोर पणे करणे आवश्यक आहे असे होताना दिसत नाही फक्त संघटनेचे जे सभासद स्विकारले म्हणून या कामगारावर अन्याय करणे ही बाब अत्यंत गंभीर आहे कंपनी व्यवस्थापनाने सर्व कामगारांना कुठलेही अटी शर्ती न ठेवता सर्व कामगारांना परत कामावर घ्यावा जर असे झाले नाही तर इथून पुढच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन वेळ वेळा टप्प्यावर करण्यात येईल असे जाहीर केले.
या मेळाव्यामध्ये संघटनेचे उपाध्यक्ष सिताराम चव्हाण यांनी कामगारांना संबोधित करताना म्हणाले ऐन संक्रांतच्या वेळी या कामगारांनावर संक्रात कोसळले आहे कामगारांनी अजिबात घाबरून जायचे कारण नाही संघटना नेहमी तुमच्या पाठीशी आहे आज जेजुरीच्या खंडेरायाला मागणी करतो कंपनी व्यवस्थापनेला खंडेराया सद्बुद्धी देवो असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी संघटनेचे पुरंदर तालुका अध्यक्ष हनुमंत मस्के हे उपस्थित होते या मेळाव्यामध्ये उपस्थित कामगारांनी त्यांच्यावर होत असलेला अन्याय अत्याचार याबाबत माहिती दिली कंपनी व्यवस्थापन व कंत्राटदार वेगवेगळ्या प्रकारची परवाने दाखवून संघटनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याबाबतही कामगारांनी माहिती दिली परंतु आम्ही सर्व कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या पाठीशी एकजुटीने राहून हा लढा चालू ठेवणार असे सर्व कामगारांनी सांगितले.
त्यानंतर कामगार आणि उत्स्फूर्तपणे जेजुरी गडाच्या पायथ्याशी पायऱ्यांवर भीक मागून आंदोलन पार पडले या वेळी कामगारांनी हातात पत्रावळी घेऊन किर्लोस्कर फेरेस व्यवस्थापनाला सद्बुद्धी द्यावी अशी याचना मल्हारी मार्तंडाच्या चरणी केली यावेळी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांनी देखील या भिख मागो आंदोलनात पत्रावळी घेऊन बसलेल्या कामगारांना भीख देऊन जात असल्याचे दिसून आले आता कंपनी या बद्दल काय भुमिका घेतील या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

