महावितरण कंपनी मध्ये कंत्राटी कामगारांना नोकरीची सुरक्षा द्या; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

रुस्तम शेख यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी  :  महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी मध्ये ५ ते १० वर्षा पासून कार्यरत असणाऱ्या बाहयस्त्रोत कंत्राटी कामगारावर अन्याय होत असून त्यांना त्यांच्या नोकरीची सुरक्षा नसून कामा वरून कमी करण्याचा कट केला जात आहे. त्यामुळे  बाहयस्त्रोत कंत्राटी कामगारांना नोकरीची सुरक्षा देऊन त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची दाद मागण्यासाठी कंत्राटी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदनातून मागणी केली आहे.

    महावितरण कंपनी मध्ये बाह्यस्त्रोत्र कंत्राटी कामगार हे ५ ते १० वर्षा पासून कार्यरत असून कोरोनाच्या संकटकाळात सुध्दा दिवस रात्र काम करुन मोलाचे योगदान दिलेले आहेत. ऊन, वारा, पाऊस व वादळी महापुरात सुध्दा घरच्या मुला बाळाची काळजी न घेता अहोरात्र कंपनी मध्ये विद्युत पुरवठा सुरळीत राहण्याचे सतत कार्य करीत असुन सुध्दा त्यांना कोणत्याच प्रकारची नोकरीची सुरक्षा मिळत नाही.

   त्या करिता बाह्यस्त्रोत्र कंत्राटी कामगारांना जॉब सेक्युरिटी मिळवून देण्यात यावी.  कंत्राटदार बदलला तरी जुन्या कामगारांना कामावरुन कमी करू नये, कोणतीही पुर्व कल्पना न देता कामगाराना कमी करण्यात येवु नये त्यामुळे वांरवार मानसिक त्रास होत आहेत.

    बाहयस्त्रोत कंत्राटी कामगारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा महावितरण कंपनीवर अवलंबून असुन त्यांना कामावरुन कमी केल्यास त्यांच्यावर उपास मारीची वेळ येईल व जगणे कठीन होईल. कारण ते कामगार महावितरण कंपनीच्या आशेवर जगत आहै.

     तरी त्यांच्यावर होणारा अन्याय दुर करण्यात यावा या मागणीसाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी व महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यवतमाळ यांना दिलेल्या निवेदनातून अमोल तेलंग, अभित वासरीकर, अनिल राठोड, गजानन कुंठावार, निखिल बोबडे, संतोष राठोड, राहुल काळे, अमित नागपुरे, सुबोध बांगडे, सूरज गमे, शैलेश जुमनाके, निखिल बोबडे, संदीप मेश्राम, राहुल वाघाडे, अरविंद अडसकर, संतोष राठोड, अनिल राठोड, चेतन मंडलकर, जीवन आवारी, राहुल निंदेकर, आशिष साखरकर, गजानन उपरे, शुभम दौलत्कार, गिरीश पाचभाई, संदिप ढोले, गणेश देवाळकर, चित्तरंजन कांबळे, राहुल विचवे, मयुर बोबडे, शंकर खामनकर, गीतेश मेश्राम, अनिल गोहणे, सुरज घरत, सुहास तुरानकर, शेख शाहरुख, प्रमोद शेंडे, सूरज कुचनकार, निखिल कोवे, शंकर लभाने व ईतर कामगारांनी मागणी केली आहे.