सीआयइ ऑटोमेटिव्ह इंडिया लिमिटेड (CIE Automotive India Limited) येथे वेतनवाढ करार संपन्न

चाकण : येथील औद्योगिक वसाहतीमधील सीआयइ ऑटोमेटिव्ह इंडिया लिमिटेड (CIE Automotive India Limited) [फोर्जिंग डिव्हिजन ] कंपनी व्यवस्थापन व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ कामगार युनियन संघटना यांच्या मध्ये पाचवा वेतनवाढ करार यशस्वीरीत्या संपन्न झाला. 

कराराची ठळक वैशिष्ट्ये :

करार कालावधी : सदर करार हा दि. 01/08/2023 ते 31/01/2027 [42 महिने] या  कालावधीसाठी लागू असेल.

पगारवाढ : सदर करार हा रु.15250/-  डायरेक्ट वाढ पगारामध्ये रु.13250/- प्रत्येक कामगारांना झाली असून ती खालील प्रमाणे.....,
प्रथम वर्षासाठी : 70% रक्कम - रुपये 9275/- 
द्वितीय वर्षासाठी : 15% रक्कम - रुपये 1987.50/- 
तृतीय वर्षासाठी : 15% रक्कम - रूपये 1987.50/- 

कामगारांस 01 ऑगस्ट पासून पुढील पाच महिने म्हणजे 31 डिसेंबर पर्यंत प्रथम वर्ष मिळणाऱ्या रकमेच्या 80%फरक देण्याचे मान्य केले. व फरकाची रक्कम ही जानेवारी च्या पगारात देण्यात येईल.

बोनस : बोनस कायदा १९६५ नूसार बोनस मिळतो. परंतु कमिटीच्या प्रयत्नाने व व्यवस्थापन यांच्या सहकार्याने सर्व कामगारांना खालील प्रमाणे बोनस मिळेल.
सन 2024 - रु. 35000/-
सन 2025 - रु. 37000/-
सन 2026 - रु. 38500/-

मेडिक्लेम पॉलिसी [वैयक्तिक] : वर्ष - 2024 ते 2026 या कालावधीत विमाराशी - रुपये 3,00,000/- + रुपये 3,00,000/- बफर  अशी एकूण रुपये 6,00,000/- कव्हर

आजार पणाची रजा : आजार पणाच्या रजेचे साठवणुक मर्यादा ही 35 दिवस राहिल.

युनिफॉर्म-वाढ :
1) मेंटेनन्स विभागातील  कामगारांना   एक अतिरिक्त कामातील ड्रेस  मिळेल. [ एकूण तीन ड्रेस ]
2) टूलरूम विभागातील वेल्डिंग सेक्शन मधील कामगारांना एक अतिरिक्त कामातील ड्रेस मिळेल [एकूण तीन ड्रेस]

एल टी ए : यामध्ये रु. 1500/- वाढ करून तो आता रु. 6500/- देण्यात येईल.

   करारावेळी व्यवस्थापना तर्फे सुनील नरके (सीओओ), विनायक कडसकर (सीआयई इंडिया ऑल ग्रुप एच आर हेड), देवेंद्र अकोलकर (एच आर हेड फोर्जिंग डिव्हिजन), कुणाल रजपूत साहेब (एच आर मॅनेजर) तसेच महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेतर्फे शिवसेना नेते आमदार सचिनभाऊ अहिर (संस्थापक अध्यक्ष), श्री गोविंदराव मोहिते (जनरल सेक्रेटरी), संजय भाऊ कदम (उपाध्यक्ष) स्थानिक कमिटी चे प्रतिनिधी संतोष महाळुंगकर (अध्यक्ष), लक्ष्मण लिंबापुरे (जनरल सेक्रेटरी), विनायक काचोळे (उपाध्यक्ष), बाळासाहेब जंजिरे (सेक्रेटरी), योगेश बोऱ्हाडे (खजिनदार), नानासाहेब खुळे (सह खजिनदार), अशोक लाटे (प्रतिनिधी) उपस्थित होते.

    कंपनीमधील सर्व कामगारांनी केलेले सकारात्मक  काम, राखलेला  सयंम , सहकार्य व महत्वाचे म्हणजे युनियन कमिटी मेंबर यांच्यावर ठेवलेला विश्वास याच्या बळावर हा करार यशस्वी ,शांततामय व जल्लोशात संपन्न झाला.