जनरल मोटर्स कामगाराच्या आंदोलनास मेधाताई पाटकर यांची भेट

तळेगाव (दि.१) : येथे चालू असलेल्या जनरल मोटर्स कामगाराच्या आंदोलनास मेधाताई पाटकर यांनी भेट दिली यावेळी कामगारांना मार्गदर्शन करताना मेधाताई पाटकर म्हणाल्या आज देशामध्ये कंपनीकरण वाढले जात आहे, शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे, हजारो शेतकरी शेकडो दिवस उपोषण केलं, किती तरी शेतकरी शहीद झाले आणि त्यांनी विजय मिळवला शेतकऱ्यांच्या रोजगारामध्ये कंपनीकरण घुसवू नये हा त्यामागचा उद्देश होता.

    राज्यांचे विकासासाठी औद्योगीकरण पाहिजे पण सरकार हे वेगळ्या दिशेने ते करू पाहत आहे. कंपन्या मनमानी करत आहेत आणि सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. रोजगार हा कामगारांचा जगण्याचा मूलभूत अधिकार आहे तोच काढून घेतला जात आहे कंपनीकरण हे संविधान विरोधी आणि श्रमिक विरोधी करण्याचा घाट घातला जात आहे.  कंत्राटीकरणाच्या नावाखाली त्यांचं शोषण करणे कायम कामगारांना काढून टाकणे अशा प्रकारची मनमानी केली जात आहे तेव्हा त्या एक कायदे मोडतात.

     कुमार मंगलम बिर्ला यांच्या सेंचुरी टेक्स्टाईल मध्ये बेकायदेशीर विक्री केली असता आम्ही त्या विरोधात लढा दिला तो जिंकलो आणि आमच्या कामगारांना कंपनीला घरी बसून पगार द्यावे लागले तुम्ही जर असेच लढत राहिलात तर जनरल मोटर्स ने केलेली बेकायदेशीर विक्री तिच्या विरोधात तुम्ही नक्की जिंकाल.

    लोकशाहीचे चार स्तंभ आहेत त्यांचा विचार केला तर विश्वास वाटतो इथे तुमच्याशी झालेला 2017 चा करार जनरल मोटर्स मान्य करत नाहीये संघर्ष करून 1947 पासून कामगार कायदे अमलात आणले,  त्या कामगार कायद्यांचा अमृत महोत्सव कुणीही साजरे करताना दिसत नाहीये.  फक्त तिरंगा फडकवला म्हणून अमृत महोत्सव साजरा होत नाही लोकप्रतिनिधींना फक्त बॅनर लावून इलेक्शन जिंकता येणार नाहीत हे आपल्याला पटवून द्यावे लागेल.  

     कंपनीने 25 ओ प्रमाणे अर्ज केला तर कायद्याप्रमाणे कामगारांना विश्वासात घेतल्याशिवाय कंपनी बंद करता येत नाही पण तुमच्या केस मध्ये त्यांनी 25(O) चे पालन केले नाही दुसऱ्या क्लोजरचा जो खेळ त्यांनी मांडला आहे तो न्यायालयात टिकणार नाही. 25 एफ एफ च्या नावाखाली त्यांना संपत्ती विकता येणार नाही हे बेकायदेशीर आहे हायकोर्टाने जर ऑर्डर केली असेल तर त्याप्रमाणे तो तुम्हाला रेफर करावा लागेल. औद्योगिक न्यायालयांना तुमची दखल घ्यावी लागेल तुमचा लढा योग्य मार्गाने होत आहे तिथे तुम्हाला माझ्या मार्गदर्शनाची गरज नाही जर यांनी कंपनी विकली असेल तर तुम्हाला रोजगार द्यावा लागेल तुमच्यावर होणारा अन्याय हा पैशाच्या लोभापाई होत आहे. रोजगार संपवणे ही सुद्धा एक हिंसाच आहे त्या विरोधात तुम्ही अहिंसेच्या मार्गाने लढत आहात हे कौतुकास्पदच आहे. जेव्हा महिला या लढ्यामध्ये उतरतात तेव्हा तो लढा यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही  मी मेधाताई पाटकर तुमच्या लढ्यामध्ये सदैव तुमच्या सोबत असेन.

    कामगारांना मार्गदर्शन करताना श्री मारुती जगदाळे म्हणाले महाराष्ट्र राज्याच्या अधिवेशनात कामगार मंत्र्यांनी चूक केली हे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे.  न्यायासाठी चाललेले आंदोलन हे कधीही चिरडून टाकता येत नाही म्हणून सरकार ही कटकारस्थान करत आहे.  न्यायालयामध्ये लेऑफ पेंडिंग आहे, retrenchment ची केस पेंडिंग आहे आणि आता हा क्लोजर नसून हस्तांतरण आहे हे सिद्ध झाले आहे .उद्या सरकारसोबत करणार असलेल्या चर्चेमध्ये या सर्व गोष्टीचा उल्लेख असणार या सर्व गोष्टी पाहिल्या जाणार म्हणून या आंदोलनाला व्यापक स्वरूप द्यावे लागणार आहे.आंदोलन थांबता कामा नये.

    कामगारांना मार्गदर्शन करताना समाजसेवक मानवजी कांबळे म्हणाले आपल्याला हा लढा अधिक तीव्र स्वरूपाचा करावा लागेल ही करण्याची तयारी ठेवा.  हे कामगार आता लढायला उतरलेत आणि जोपर्यंत जिंकत नाहीत तोपर्यंत हार मानायची नाही. 92 दिवस झाले हा कृतीशील कार्यक्रम आखला गेला काही दिवसात शंभर दिवस होतील पण तुम्ही न थकता लढताय याबद्दल तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे.  सरकारने जे ठरवले आहे ते ते बेकायदेशीरपणे करत आहेत आपण पण जे ठरवले ते केल्याशिवाय आपण गप्प बसायचे नाही. त्याशिवाय पर्याय नाही.  आपली प्रत्येक कृती नोकरी वाचवण्यासाठी आहे ज्याला भेटाल तिथे ही चर्चा करा जनरल मोटर्स बंद करणाऱ्या नालायक सरकारचं करायचं काय,  त्यांचं वाटोळ कसं करता येईल घराघरात हा प्रचार झाला पाहिजे  त्याशिवाय त्यांना अक्कल येणार नाही ज्या पद्धतीने कामगार लढा व्हायला पाहिजे त्याप्रमाणे सर्व संघटनांनी त्यांच्या नेत्यांनी जर तुम्हाला पाठिंबा दिला नाही तर ही संपूर्ण कामगार चळवळीशी गद्दारी आहे.  कंपनीचे हस्तांतरण करणे म्हणजे सर्व कामगारासहित झाले पाहिजे अन्यथा hyundai कंपनीला गेट सुद्धा उघडू देणार नाही. भाडेकरू सुद्धा मालकाला जेरीस आणतो. आम्ही तर आमच्या हक्कासाठी लढतोय.  सगळे जग नवीन वर्षाचा आनंद उत्सव साजरा करत आहे आणि इथे आपले कामगार मुला बाळा सहित आंदोलनाला रस्त्यावरती बसले आहेत त्यांना तुम्ही पाठिंबा द्यायला पाहिजे, जनता तुमच्या पाठीशी उभी राहिली पाहिजे. रयतेच्या गवताच्या काडीला सुद्धा हात लावू देणार नाही असं म्हणणाऱ्या छत्रपतींचे नाव घेणाऱ्या राजकारण्यानी आमचे घर बळकवण्याची तयारी केली असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. न्याय प्रविष्ट मार्गाने त्यांच्या विरोधात लढा दिला जाईल.