विलो मॅथर ॲण्ड प्लॅट पंप्स प्रा. लिमिटेड (Wilo Mather and Platt Pumps Pvt Ltd) येथे रिलोकेशन पॉलिसी आणि वेतनवाढ करार संपन्न

पिंपरी चिंचवड : औद्योगिक नगरीतील विलो मॅथर ॲण्ड प्लॅट पंप्स प्रा. लिमिटेड,  चिंचवड (Wilo Mather and Platt Pumps Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि मॅथर ॲण्ड प्लॅट एम्प्लॉईज युनियन चिंचवड यांच्यामध्ये रिलोकेशन पॉलिसी आणि बारावा वेतनवाढीचा करार, शांततामय उत्साहवर्धक आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी संपन्न झाला. 

कंपनी व्यवस्थापन आणि युनियन यांच्यातील  यशस्वी करार पुढील प्रमाणे :

रिलोकेशन पॉलिसी बेनिफिट -

1) वन टाईम रिलोकेशन अलाउन्स - रुपये 70,000/-

2) दरमहा रिलोकेशन अलाउन्स म्हणून पगारात मिळणारी रक्कम = रुपये 5,000/- आणि दिनांक 1 एप्रिल 2023 पासून अतिरिक्त पगार वाढ रक्कम रुपये 5,000/- यामधील 50% रक्कम बेसिक मध्ये अशी एकूण 10,000/- एवढी रक्कम रिलोकेशनच्या अनुषंगाने मिळेल.

3) शिरवळ,केसुर्डी, परिसरात ज्या कामगारांना घर घ्यावयाचे आहे, अशा कामगारांना ॲडव्हान्स म्हणून रुपये 1,30,000/- मिळतील आणि सदर रक्कमेची परतफेड रुपये 5,000/- प्रति महा पगारातून केली जाईल.

4) ग्रुप टर्म इन्शुरन्स पॉलिसी :- ₹ 15 लाख किंवा 3 टाईम CTC (जे जास्त असेल ते मिळेल.)

5) ग्रुप मेडिकल पॉलिसी :- 3 लाखावरून 4 लाख करण्यात आली आहे.

6) शिफ्टिंग लिव्ह :- जे कामगार केसुर्डी- शिरवळ नजीकच्या परिसरात राहण्यासाठी जातील त्यांना तीन दिवसाची शिफ्टिंग लिव्ह मिळेल.

7) बस सुविधा :- चिंचवड ते केसुर्डी शिरवळ प्रकल्पापर्यंत येणे-जाण्यासाठी 12 महिने बस सुविधा उपलब्ध असेल. जे कामगार केसुर्डी शिरवळ परिसरात राहण्यासाठी जातील किंवा बस सुविधेचा लाभ घेणार नाहीत अशा कामगारांना एक वर्षासाठी  दरमहा रुपये 4,800/- मिळतील.

8) 12 महिन्यानंतर बस सुविधा बंद झाल्यास कामगारांना रुपये 2500/- एवढी रक्कम प्रतिमहा मिळेल.

वेतनवाढ करार :

पूर्वीचा वेतनवाढीचा कराराची मुदत संपण्यापूर्वी 9 महिने अगोदर करार झाला हे मुख्य वैशिष्ट्य आहे

1) करार कालावधी : 01/01/2024 ते 31/12/2026 (36 महिने)

2) करार रक्कम :- रुपये 17,500/- CTC पैकी 50 टक्के रक्कम बेसिक मध्ये.
विभागणी तीन टप्प्यात  पुढील प्रमाणे :
01/01/2024 ते 31/12/2024 :- रुपये 5,500/-
01/01/2025 ते 31/12/2025 :- रुपये 6,000/-
01/01/2026 ते 31/12/2026 :- रुपये 6000/-

3) सेवा जेष्ठता सर्विस इन्क्रिमेंट रुपये 165/- ते 365/-

4) एल टी ए :- रुपये 16296/- मध्ये वाढ करून रुपये 23,160/- करण्यात आली.(CTC)

5) दैनंदिन,मासिक आणि वार्षिक हजेरी प्रोत्साहन :- म्हणून मिळणारी संपूर्ण रक्कम ही सध्या मिळणाऱ्या शैक्षणिक भत्त्यामध्ये विलीन करण्यात आली आहे ती पुढील प्रमाणे.
A) रुपये 1844/-
B) रुपये 1651/-
C) रुपये 1381/-

6) रात्रपाळी भत्ता :- वाढ करून रुपये 182/- वरून  219/- प्रति दिन एवढी करण्यात आली आहे 

    सदर करार यशस्वीरीत्या संपन्न करण्यासाठी व्यवस्थापनाच्या वतीने हेमंत वाटवे (एम.डी, & सी.ई.ओ.), नितीन आसलकर (व्हॉइस प्रेसिडेंट एच आर), जयंत देशपांडे (प्लांट हेड), श्रीकांत शिरोडकर (फायनान्स हेड), श्रीधर जाधव (डेप्युटी जनरल मॅनेजर एचआर) तसेच युनियनच्या वतीने अमोल शेळके (अध्यक्ष), गौतम लोखंडे (जनरल सेक्रेटरी), दत्तू झेंडे, नेताजी गाडे, मानसिंग शिंदे, महेश कदम, निलेश माने, गणेश कानेटकर, विकास करपे यांनी करारावर स्वाक्षरी केली

    सदर करार संपन्न होण्यासाठी श्रमिक एकता महासंघ (SEM), महासंघाचे सल्लागार,कामगार चळवळीसाठी आणि कामगारांच्या हितासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काम करणाऱ्या सर्व मान्यवरांचे सहकार्य लाभले, त्यासर्वांचे संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले.