चाकण : येथील औद्योगिक नगरीतील टेनेको क्लीन एअर इंडिया लिमिटेड (Tenneco Clean Air India Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि टेनेको एम्प्लॉईज युनियन चाकण यांच्यामध्ये वेतनवाढीचा करार, शांततामय उत्साहवर्धक आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मंगळवार, दिनांक 22.09.2026 रोजी वेतन करार संपन्न झाला आहे.
कराराची ठळक वैशिष्टये खालील प्रमाणे :
पगारवाढ : एकूण ₹20,800/-
कालावधी : 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2028 तीन वर्ष
2027 – ₹8,320/- (Basic ₹4,160/-)
2028 – ₹6,240/- (Basic ₹3,140/-)
यामध्ये Employer PF चा समावेश आहे.
फरकाची रक्कम : जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या ८ महिन्यांची १००% फरकाची रक्कम सप्टेंबर २०२६ च्या पगारात देण्यात येईल.
2025-26 : ₹44,500/-
2026-27 : ₹47,000/-
2027-28 : ₹48,000/-
पूजा गिफ्ट : ₹2,000/- वाढ करून ₹24,000/- करण्यात आले.
आरोग्य व सामाजिक सुरक्षा :
Sum Assured – ₹2.50 लाख
Buffer – ₹20 लाख
Room Rent Limit – ₹3,500/-
व्यवस्थापन योगदान – ₹16 लाख
कामगार योगदान – दोन दिवसांचा पगार
GPA – ₹5 लाख
GTL – ₹10 लाख
SSPL रजा : Critical Illness साठी SSPL रजा ३० दिवसांवरून ५० दिवस.
वेतन व सेवा-सुविधांमधील महत्त्वाच्या तरतुदी
Gratuity Calculation : Basic + DA सोबत LTA व Special Allowance यांचाही समावेश.
Basic – Gross च्या 50%
HRA – Basic च्या 70%
Conveyance – Basic च्या 12.5%
LTA – Basic च्या 4.7%
उर्वरित – Special Allowance
Over Time Calculation : नवीन Labour Code लागू झाल्यानंतरही OT Calculation साठी संपूर्ण Gross Salary विचारात घेतली जाईल.
Sick Leave Capping : डिसेंबर २०२८ पर्यंत Sick Leave साठवणुकीची मर्यादा ६० दिवसांपर्यंत.
सेवानिवृत्ती भेट : कुटुंबीयांसमवेत निरोप समारंभ तसेच ₹15,000/- ची भेटवस्तू / Gift Voucher.
क्रीडा Sponsorship : कामगाराच्या पाल्याची राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाल्यास CSR अंतर्गत आर्थिक मदतीची तरतूद.
रात्रपाळी भत्ता : तिसऱ्या पाळीसाठी Night Shift Allowance मध्ये ₹25/- ची वाढ करून तो ₹125/- प्रतिदिन करण्यात आला आहे.
करार करिता व्यवस्थापनाच्या वतीने श्री. हरि कृष्णा बुद्ध – Operations Director, श्री. मारीमुथू एम. – HR Director, श्री. संजय आव्हाळे – Plant Manager, श्री. दिगंबर वाहतुळे – Plant HR मॅनेजर तसेच कामगारांच्या वतीने श्री. तात्यासो भोसले – अध्यक्ष, श्री. सत्यवान पानसरे – जनरल सेक्रेटरी, श्री. संदीप दरेकर – उपाध्यक्ष, श्री. गणेश खैरे – उपाध्यक्ष, श्री. सुनील मदुगडे – सहाय्यक सचिव, श्री. संपत जाधव – सहाय्यक सचिव, श्री. गणेश गुंजाळ – खजिनदार यांनी काम पहिले.
सदर वाटाघाटी प्रक्रियेत श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार श्री. मारुती जगदाळे सर, श्री. दिलीप पवार सर, अध्यक्ष श्री. किशोर सोमवंशी व जनरल सेक्रेटरी श्री. रोहित पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.

