वायका इन्स्ट्रुमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Wika Instruments India Private Limited) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : केसनंद, हवेली जि.पुणे येथील वायका इन्स्ट्रुमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड  (Wika Instruments India Private Limited) कंपनी व्यव्यस्थापन आणि वायका कामगार संघटना यांच्यामध्ये वेतनवाढ करार दि. 23 मार्च 2023 रोजी शांततामय, उत्साही आनंदी वातावरणात संपन्न झाला.

कराराची ठळक वैशिष्ठ्ये पुढीलप्रमाणे :

पगारवाढ :- जुलै 2022 ते जुन 2025 या 3 वर्षासाठी  19,900/- CTC, 15700/- GROSS इतकी पगारवाढ करण्यात आली.
प्रथम वर्ष - रुपये 7850/- पगारवाढ
द्वितीय वर्ष  - रुपये 3925/- पगार वाढ
तृतीय वर्ष  - रुपये 3925/- पगार वाढ

प्रोडक्शन इन्सेंटिव्ह : सद्याचा 338 कोटी sales विचारात घेउन  वार्षिक एकुण achive sales च्या ग्रॉस एका महिन्याच्या पगाराच्या 70% टक्के रक्कम ठरविण्यात आली आहे. 

मेडिक्लेम पॉलिसी :  आई-वडिलांसाठी 2 लाखावरून रु. 2.25 लाख आणि दोन मुलं पत्नी आणि स्वतःसाठी 2 लाखा वरून 2.25 करण्यात आला आहे. दोन्ही मिळून 4.5 लाख रुपये, अतिरिक्त 15  लाख Copororate Buffer Policy करण्यात आली आहे. रुल करंट practice प्रमाणे.

नाईट शिफ्ट अलाउस : रु. 50/- वाढ करून एकूण रु.150/- करण्यात आला

उत्पादकता वाढ : 3.9% to 4.5% उत्पादकता वाढ 

सुधारित वाहतूक व्यवस्था : वाहतुक व्यवस्थेमध्ये हडपसर पासून फुरसुंगी गावापर्यंत वाहतूक व्यवस्थेमध्ये वाढ

पेट्रोल Allowance : रू 1200/- मध्ये पहिल्या वर्षी 300/- रु ने वाढ दुसऱ्या वर्षी 100/- रु व तिसऱ्या वर्षी 100/- रुपये इतकी वाढ झाली, एकूण 1700/- रुपये वाढ झाली.

कंपनी रजा : सध्या चालू असलेल्या रजा पुढे कायम करण्यात येत आहे

LTA : मागील करारानुसार रु.15000/-

दिवाळी बोनस : बेसिक पगाराच्या 20% (बेसिक पगार 43%) उदा. एका महिन्याचा पगार

मेडिकल चेकअप : कंपनीत on duty करण्यात येईल, जर एखाद्या कामगारांना 2D Eco किंवा स्ट्रेस टेस्ट आवश्यक असल्यास वाघोली याठिकाणी चेकिंग ची सुविधा केली जाईल. व कामगारांना वयाच्या 40 वर्षानंतर सह पत्नी दोघांचे मेडिकल चेकअप करण्याचे मान्य झाले आहे.

दि.01/07/2022 रोजी पासुन 100% फरक देण्याचे उभयपक्षी मान्य करण्यात आले. व्यवस्थापन आणि युनियन यांनी win-win situation मध्ये कामगार आणि कंपनीचे हित साधणारा करार स्वाक्षांकित करून उत्साहाचे वातावरण कंपनीत आणि कामगार परीवारात निर्माण केले आहे.

    सदर करारासाठी व्यवस्थापनातर्फे MD गौरव बावा, प्लांट head – विलास कुलकर्णी, HR head रंजीत भोसले,HR श्री. योगेश सावंत व पुष्कराज अँथोनी, Sr. Manager प्रशांत कदम, प्रॉडक्शन मॅनेजर दिलबाग सिंग मुंगेरा, प्रवीण साळुंखे, सतीश ढवळे, डीजे रॉय तासेच कामगार प्रतिनिधीतर्फे युनियन अध्यक्ष नारायण हरगुडे, जनरल सेक्रेटरी योगेश हरगुडे, उपाध्यक्ष वासुदेव सदाराव, खजिनदार विष्णुपंत सातव आणि सचिन सातव, सोमनाथ जाधव, ईश्वर पाटील, सोमनाथ हरगुडे, दादा देवकाते यांनी करारावर स्वाक्षरी केल्या.

या करारसाठी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष तसेच युनियन सल्लागार किशोर ढोकले यांनी अथक परिश्रम घेतले, युनियन आणि मॅनेजमेंट यांच्यातील win win रिलेशन मजबूत करून दिले.