नागपूर : हिंगणा एमआयडीसी येथील एका कंपनीला आग लागली आहे. निपाणी गावाजवळ असलेल्या कटारिया ग्रुपमध्ये ब्लास्ट झाल्यानंतर आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीत 3 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हिंगणा एमआयडीसीतील सोनेगाव निपाणी येथे कटारिया अॅग्रो प्रा. लि. या कंपनीत आग लागल्याने 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला,
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणली. आगीमुळे आसपासच्या परिसरामध्ये धुराचे ढग पसरले होते. दरम्यान या आगीमध्ये कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
