कामकाजाचे तास वाढविणार, तामिळनाडू विधानसभेत विधेयक मंजूर; ४ दिवस काम, ३ दिवस सुटी

चेन्नई : तामिळनाडूच्या विधानसभेत अखेर १२ तास ड्युटी विधेयकाला मंजूरी मिळाली आहे. तामिळनाडू विधानसभेने कारखाना (दुरुस्ती) कायदा २०२३ मंजूर केला. या कायद्याअंतर्गत राज्यातील कारखान्यांमधील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांबाबत लवचिकता स्वीकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यामुळे आता अशा कर्मचाऱ्यांचे कामाचे तास ८ वरून १२ तासांपर्यंत वाढवता येणार आहेत. असे वृत्त नवराष्ट्र वृत्तसंस्थेने दिले आहे.

नियमामध्ये बदल नाही

या कायद्याचा महिला कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आला आहे. कामगार कल्याण मंत्री सीव्ही गणेशन म्हणाले की उर्वरित तीन दिवसांच्या रजेचे पैसे दिले जातील आणि रजा, ओव्हरटाईम आणि पगार इत्यादींबाबतच्या सध्याच्या नियमांत कोणताही बदल होणार नाही, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

१३ राज्यांनी स्वीकारला केंद्राचा प्रस्ताव

दरम्यान केंद्र सरकारने नुकतेच सर्व राज्य सरकारांना कर्मचाऱ्याच्या ड्युटीचे दिवस आठवड्यातून ४ पर्यंत कमी करण्याबाबत आणि कामाचे तास ८ वरून १२ करण्याचे आवाहन केले होते. अनेक राज्यांनी केंद्र सरकारच्या या आवाहना प्रतिसाद देण्यास सुरुवात केली

विरोधकांचा विरोध

या कायद्यामुळे अनिवार्य कामाच्या तासांची संख्या सध्याच्या ८ वरून १२ होईल अशी टीका विरोधकांकडून करण्यात आली. याला उत्तर देताना थेन्नारसू यांनी ज्या कर्मचाऱ्यांकडे आठवड्यातून 4 दिवस काम करण्याचा व तीन दिवस सुटी घेण्याचा पर्याय आहे त्यांच्यासाठी आठवड्यातील कामाच्या तासांमध्ये कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्ट केले आहे.