महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात या योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांकडे LIN नंबर (Labour Identification Number) आवश्यक आहे. प्रत्येक कामगाराला LIN नंबर कळविणे हि कंपनी व्यवस्थापन / आस्थापना यांची जवाबदारी आहे.
LIN नंबर कसा मिळवाल :
- तुमचा LIN नंबर मिळविण्यासाठी तुम्ही काम करत असलेल्या कंपनी व्यवस्थापन / आस्थापना यांच्या कडे मागणी करा.
- मागणी करून देखील नंबर मिळाला नाही तर तुमच्या भागातील कामगार कल्याण केंद्र प्रमुख,अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी.