युनि-पॉल इंडिया प्रा.लि. (Uni-pol India Pvt Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : पिंपळे जगताप औद्योगिक वसाहतीमधील युनि-पॉल इंडिया प्रा.लि. (Uni-pol India Pvt Ltd)   कंपनी व्यवस्थापन आणि युनि-पॉल इंडिया कामगार संघटना यांच्या मध्ये दुसरा वेतन वाढीचा करार दि. ०३/०३/२०२२ रोजी यशस्वीरीत्या व अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.

कराराची ठळक वैशिष्ट्ये :

१) पगार वाढ : प्रत्येक कामगाराला प्रत्यक्ष १७,०००/- रूपयांची पगार वाढ आणि अप्रत्यक्ष २०,८००/- रुपयांची भरघोस पगारवाढ  करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दरमहा ३,०००/- रूपये इंन्सेंटीव्हच्या स्वरूपात देण्यात आले.

२) करार कालावधी : हा करार ३३ महिन्यांसाठी असेल दि. ०१ फेब्रुवारी २०२२ ते दि. ३१ ऑक्टोबर २०२४  या कालावधीसाठी असणार आहे.

पहिल्या वर्षी  - रुपये ७७००/-
दुसऱ्या वर्षी - रुपये ६३००/- 
तिसऱ्या वर्षी (९महिन्यांसाठी) - रुपये ३०००/- अशी वाढ असणार आहे.

३)  भेटवस्तू : व्यवस्थापनाने ३,५००/- चे गिफ्ट व्हाउचरची रक्कम मार्च महिन्याच्या पगारात देण्याचे मान्य केले

४)  मेडीक्लेम पॉलिसी : प्रती वर्षी प्रिमियममध्ये १८०० ने वाढ करण्यात आली आहे .सदर पाॅलिसीत स्वतः कामगार,पती/पत्नी, ०२.अपत्य यांचा समावेश असेल. 

५) मेडिकल चेक-अप : वर्षातून २ वेळेस  होईल.

 ६)  रजा : सी.एल.- ०७ दिवस, एस.एल.-०७ दिवस, ई.एल :- २४ दिवस,  कमीतकमी 3 दिवस व जास्तीतजास्त ७ वेळा घेण्याची सवलत राहील, मातृत्व रजा-६  महिने 

७) निवडणुक रजा : विधानसभा व लोकसभा

८)  साठवणुक : ई.एल.- १०० दिवस (अधिक चालु वर्षाच्या), एस.एल.- ३० दिवस 

९) रजा रोखीकरण : १०० च्यापुढे मुळ पगार +महागाई/ स्पेशल/ VDA अलाउंस ग्राह्य मानले जाईल. 

१०) परंतु वर्षभरात ७ सी.एल. घेणे  बंधनकारक आहे.

११) दिवाळी बोनस :        
पहिल्या वर्षी बेसिक + डिएच्या १२% 
दुसऱ्या वर्षी बेसिक+डिएच्या १०% 
तिसऱ्या वर्षी बेसिक+डिएच्या १०%
दिवाळी सनाच्या १५ दिवस आधी कामगारांच्या खात्यात जमा होईल.

१२) ज्यादा कामाचा मोबदला ( Over Time ) : फॅक्टरी ॲक्ट, १९४८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे किंवा कामगारांस एच्छिक १ C-OFF घेण्याची सवलत राहील

१३) गणवेश आणि सुरक्षा शुज : दरवर्षी मार्च महिन्यात गणवेशाचे २ ड्रेस दिले जाईल.व त्याचबरोबर १ टी शर्ट दिला जाईल तसेच  सुरक्षा शुजचा १ जोड दिला जाईल.  

१४) पगारी सुट्या : १० तसेच पगारी सुट्टी जर साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी आल्यास ती सुट्टी व्यवस्थापन आणि संघटना यांच्यात चर्चा करून इतर दिवशी देण्यात येईल.

१५) मिठाई : दिवाळी- १  किलो मिठाई देण्यात येईल

१६)  कॅन्टीन :आठवड्यातून एकदा अंडाकरी, आठवड्यातून ३ वेळा स्वीट, आठवड्यातून दोन वेळा आईस्क्रीम, रोज केळी,सलाड,पापड देण्यात येईल 

    यामध्ये प्रती महिना ६०० ने वाढ करण्यात आली आहे व्यवस्थापन आणी संघटना यांच्यामध्ये चर्चा करून नवीन मेनू ठरविण्यात येईल.

१७) सॅलरी ऍडव्हान्स :  रुपये १,००,०००/- पर्यंत बिनव्याजी ( वैद्यकीय हेतु साठी ) देण्यात येईल

१८) फॅमिली डे : कौटुंबिक स्नेह संमेलन वर्षातुन एकदा कुटुंबातील सदस्यांसह साजरा करण्यात येईल.

१९) दसरा सेलीब्रेशन : दरवर्षी प्रमाणे दसरा सेलेब्रेशन साजरा करण्यात येईल.

२०) मृत्यू सहाय्य निधी : सर्व कामगारांचे प्रति  कामगार ३,००० हजार इतकी रक्कम  पगारातुन मृत्यू सहाय्य निधी साठी कापून घेण्यात येईल आणि कंपनी त्याच्या दुप्पट रक्कम  सदर निधीत जमा करेल.

२१) वाहन पार्किंग सुविधा : कंपनी कामगारांसाठी/ कर्मचा-यांसाठी वाहन पार्किंग सुविधा प्रधान करेल.

२२) सहल : दरवर्षी एकदा आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी सर्व कामगारांची एक दिवसाची सहल नेण्यात येईल. सहल खर्च ( परिवहन,स्नॅक्स, चहा आणि लंच/डीनर ) कंपनीद्वारे देण्यात येईल.

२३) अल्प सुट्टी : कंपनी प्रत्येक महिन्यात दोन वेळा कमीतकमी २ तासांपर्यंत अल्प सुट्टी देईल.

२४) युनियन मासिक योगदान : कामगारांची युनियन मासिक वर्गणी कामगारांच्या खात्यातुन कपात करण्यात येईल.

२५) इमरजेन्सी वाहन : अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत कंपनीने कामगारांस  २४ तास वाहन सेवा ड्रायव्हरसह कंपनीद्वारे देण्यात येईल.

२६) क्रिकेट : वर्षातून एकदा UPI लीग स्पर्धा  आयोजित करण्यात येईल.

२७) चालू वेतन करार संपण्यापूर्वी  ८ महिने अगोदर नवीन वेतन कराराविषयीं चर्चा करण्यात येईल

२८) मागील वेतन करारतील सर्व सोयी- सवलती आहेत तशाच पुढे चालू राहतील. 

२९) सर्व कामगारांना लॉकर देण्यात येईल.

    सदर वेतनवाढ करार मध्ये जनरल मॅनेजर ओंकार कुलकर्णी, डिप्युटी जनरल मॅनेजर गुलाब ठाकरे, एच.आर.मॅनेजर अशोक चव्हाण, क्वाॅलिटी मॅनेजर अभिजीत सोनवणे, एच. आर.ऑफिसर राहुल पवार यांनी तसेच कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष म्हस्कुनाथ भोसले, उपाध्यक्ष सुजित ढोले, जन. सेक्रेटरी सागर माळी, सह सेक्रेटरी पवन तिवारी, खजिनदार भाग्यश्री बेंद्रे/ ढमढेरे, सह खजिनदार सूर्यकांत म्हसुडगे, सदस्य शिवाजी नाईकरे यांनी कामकाज पाहीले .

    या करारासाठी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष किशोर ढोकले यांनी मार्गदर्शन केले तसेच सदर करारवेळी अपर कामगार आयुक्तअभय गिते, सह कामगार आयुक्त डी.डी पवार, राष्ट्रवादी कामगार सेल प्रदेक्षाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे हे उपस्थित होते अशी माहिती कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आली.