रांजणगाव MIDC येथे PF योजनांची माहिती देणा-या सेमिनाराचे आज आयोजन

राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार - गणेश ताठे

पुणे : आज दि. २ मार्च २०२२ रोजी रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील सर्व आस्थापना मधील कामगारांना व त्यांच्या वारसांना भविष्य निर्वाह निधीचे (PF) लाभ मिळवून देण्यासाठी भविष्य निर्वाह निधी पुणे विभागीय कार्यालयाच्या वतीने फिजिकल सेमिनार आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे यांनी दिली.

   या सेमिनार साठी सुरज डी पाटील (क्षेत्रीय पी.एफ.कमिशनर), सुनिल चिवटे (सहाय्यक पी.एफ.कमिशनर), धनंजय मोहिते (पी.एफ.आयुक्त सचिवालय)  यांच्या प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

     सेमिनार मध्ये PF बाबत ई-नॉमिनेशन, डेथ बेनिफिट, UAN आणि KYC,  प्रयास पेन्शन, भविष्य निर्वाह निधी  नवीन नियम याबाबत माहिती देण्यात येणार असून हे सेमिनार रांजणगाव इंडस्ट्रीयल असोसिएशन कार्यालय (RIA) येथे आज दि. २ मार्च २०२२ रोजी दुपारी ३ ते ५ यावेळेत होणार आहे.