पिंपरी चिंचवड : येथील औद्योगिक नगरीतील एलांन्टास बेक इंडिया लिमिटेड (ELANTAS Beck India Ltd) व एलांन्टास बेक एम्प्लॉईज युनियन यांनी अतिशय कमी वेळात वार शुक्रवार,दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येचा योग औचित्य साधून अत्यंत आनंददायी आणि उत्साही वातावरणात दुसरा वेतनवाढ करार स्वाक्षांकित केला.
कराराची ठळक वैशिष्ट्ये :
- पगारवाढ :
१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या बारा महिन्यांकरिता रु.१८५००/-
१ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या बारा महिन्यांकरिता रु.५००/-
१ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या बारा महिन्यांकरिता रु.५००/-
- मेडिक्लेम पाॅलिसी :
२ लाखांवरून ३ लाख रुपये करण्यात आली आहे सदरचा हप्त्यात १०००/- रुपये हा मागील करारानुसार CTC चा भाग आहे. नविन करारानुसार २५०/- रुपये अतिरिक्त कंपनीकडून सदर भत्यामध्ये जमा करण्यात येतील. हा CTC चा भाग नाही.
- अपघात विमा (GPA) :
पुर्वी १० लाख रुपये होता यामध्ये वाढ करुन तो या करारानुसार २० लाख रुपये करण्यात आलेला आहे. हा CTC चा भाग नाही.
- मेडिकल बिल (Reimbursement) :
प्रत्येक वर्षाला माहे एप्रिल च्या पगारात एक महिन्याचा बेसिक देण्यात येईल. हा CTC चा भाग नाही.
- वार्षिक इन्क्रिमेंट :
दर वर्षाला बेसिक मध्ये ३% पगारवाढ एप्रिल महिन्यात करण्यात येईल. हा CTC चा भाग नाही.
- बोनस / सानुग्रह अनुदान :
यामध्ये नवीन वेतन करारानुसार पुर्वीच्या पद्धतीत बदल करून मिनिमम वेजेस व डी. ए. च्या २०% रक्कम ही बोनस/ सानुग्रह अनुदान देण्यात येईल. तसेच जो कामगार बोनस कायद्यास पात्र होणार नाही त्यास संपूर्ण रक्कम ही सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येईल.
सदर वेतन करारानुसार प्रत्येक कामगारास पहिल्या वर्षी प्रती माहे रु. १६१९६/- डायरेक्ट वाढ मिळणार आहे. मागील करारातील सर्व सेवा शर्थी व अटी आहे तशाच पुढे चालु राहतील असे उभयपक्षींनी मान्य केले आहे.
या करारावर व्यवस्थापनाकडून मिलिंद तलाठी (Whole time Director), मिलिंद प्रभुणे (Factory Manager), नरेंद्र रुमाले (P&IR Manager), हर्षद पाटिल (P& IR) तसेच कामगार संघटनेच्या वतीने विशाल शेटे (अध्यक्ष), विष्णुदास तोरणे (उपाध्यक्ष), सागर पाटील (जन. सेक्रेटरी), नितिकेश कलापुरे (सह. जन. सेक्रेटरी), सचिन जाधव (खजिनदार), बसवंत हेगडे (सदस्य), संदीप कानडे (सदस्य) यांनी काम पाहिले.
व्यवस्थापन आणि कामगार संघटना यानी (Win-Win Situation) मध्ये कामगार व कंपनी यांचे हीत साधणारा करार स्वाक्षांकित करुन अतिशय उत्साहाचे व आनंदाचे वातावरण कंपनी व कामगार परिवारांत निर्माण केले आहे. तसेच यापुढेही असेच वातावरण कायमस्वरूपी राहील असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
हा वेतनकरार यशस्वी होण्यासाठी श्रमिक एकता महासंघाचे सहकार्य लाभले असून इतर सहकारी संघटना यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या मदत व सहकार्य केले.