खोपोली : येथील औद्योगिक वसाहतीमधील वर्टसिला इंडिया प्रा. लिमिटेड (Wartsila India Pvt. Ltd.) कंपनी व्यवस्थापन आणि वर्टसिला एप्लाईज युनियन सुमारे दिड वर्ष प्रलंबित असलेला पगारवाढीचा करार दि. २४/०२/२०२२ रोजी संपन्न झाला.
कराराची ठळक वैशिष्ट्ये :
- सदर करार १/०५/२०२१ ते ३०/०४/२०२४ असा तीन वर्षाकरिता असेल.
- रुपये १४,०००/- पगारवाढ देण्यात आली.
- बोनस म्हणून एक सीटीसी पगार देण्यात येणार.
- कंपनीकडून ट्रीप, कॅन्टीन फॅसिलिटी
- लॉंग सर्विस अवॉर्ड म्हणून एक ग्रॅम सोन्याचे कॉइन
सदर करारात व्यवस्थापन प्रतिनिधी म्हणून प्रणेश रामकृष्णन, श्री राजकुमार झावर, नरेंद्र निवासकर, ज्योतीराम पुडेकर, नीता प्रकाश व शशिकांत शेट्टी हे उपस्थित होते. तसेच वर्टसिला एप्लाईज युनियन तर्फे अध्यक्ष किशोर जोशी, उपाध्यक्ष नितीन जोशी, जनरल सेक्रेटरी महेश देशमुख, सह सेक्रेटरी आनंद पै, खजिनदार विशाल भगत, जेष्ठ सदस्य किरण भोईर व पंकज पालांडे हे उपस्थित होते.
सदर करारात श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार श्री अरविंद श्रोत्री, अध्यक्ष दिलीप पवार , मनोज पाटील व सर्व पदाधिकारी ह्यांचे मोलाचं मार्गदर्शन व सहकार्य मिळाले अशी माहिती युनियन तर्फे देण्यात आली.