महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे दिले जाणारे प्रतिष्ठेचे गुणवंत कामगार पुरस्कार २०१९ जाहीर करण्यात आले आहेत. यात कामगार भूषण पुरस्कारासाठी राजेंद्र हिरामण वाघ यांची निवड करण्यात आली असून ते कमिन्स इंडिया लि.कोथरुड, पुणे येथे प्रोडक्शन असोसिएट पदावर कार्यरत आहेत. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात ते कार्यरत असून त्यांचे जीवन, मशाल, निर्भय, काव्यधनू हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. तसेच इतर ५१ जणांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्रदान करण्यास शासन मान्यता प्राप्त झाली आहे.
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या कामगारांना मंडळातर्फे पुरस्काराने गौरवण्यात येते. दरवर्षी एका कामगाराची कामगार भूषण पुरस्कारासाठी तर ५१ कामगारांची गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. सर्व पुरस्कार्थींचे कामगार मंत्री मा.ना.श्री.हसन मुश्रीफ, कामगार राज्यमंत्री मा.ना.श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, कामगार विभागाच्या प्रधान सचिव मा.श्रीमती विनिता वेद-सिंगल, कल्याण आयुक्त मा.श्री.रविराज इळवे यांनी अभिनंदन केले आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.
पुरस्काराचे स्वरुप -
कामगार भूषण पुरस्कारासाठी रु.५० हजार, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरवण्यात येते. तर गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी रु.२५ हजार, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र प्रदान करण्यात येते.
पुरस्कार्थींची जिल्हानिहाय यादी खालीलप्रमाणे आहे.-
१) कामगार भूषण पुरस्कार –
राजेंद्र हिरामण वाघ (कमिन्स इंडिया लि.कोथरुड, पुणे)
२) गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार –
मुंबई – तानाजी एकनाथ निकम (कॅनरा बँक, घाटकोपर, पूर्व), अविनाश एकनाथ दौंड (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, चर्नी रोड), विनोद नारायण विचारे (स्टेट बँक ऑफ इंडिया, लालबाग शाखा), संपत विष्णु तावरे (महानंद दुग्धशाळा, गोरेगाव), किरण राजाराम जाधव (हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळ, परळ), संजय शांताराम तावडे (मुंबई पोर्ट ट्रस्ट, रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, बॅलार्ड इस्टेट), सखाराम रामचंद्र इंदोरे (गोदरेज ॲन्ड बॉईज कं.लि.विक्रोळी) चंद्रकांत महादेव मोरे (बँक ऑफ महाराष्ट्र, परेल), राम बारका सारंग (माझगांव डॉक शि. बि. लि., माझगांव),
नवी मुंबई – जयवंत यशवंत कुपटे (भारत बिजली लि. एैरोली, नवी मुंबई), विलास हसुराम म्हात्रे (नवी मुंबई महानगरपालिका, परिवहन उपक्रम),
ठाणे - अजय यशवंत दळवी (सिम्बोलिक फॅब्रिक प्रा.लि.भिवंडी), वैभव हरीश्चंद्र भोईर (परिवहन सेवा, ठाणे महानगरपालिका),
पालघर - राजेश रमाकांत वर्तक (टाटा स्टील लि., तारापूर वायर प्लॉट नं.१, ता.जि.पालघर),
पुणे - किरण चंद्रकांत देशमुख (अल्फा लावल इंडीया प्रा.लि. दापोडी), हनुमंत रामचंद्र जाधव (लोकमान्य हॉस्पिटल, निगडी), बाळासाहेब लिंबराज साळुंके (टाटा मोटर्स कंपनी लि., पिंपरी), शिवाजी सुबराव पाटील (टाटा मोटर्स कंपनी लि., पिंपरी), दत्तात्रय पांडुरंग गायकवाड (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, दापोडी), संजीव राम माने (कमिन्स इंडीया लि.कोथरुड), दिलीप नामदेव पासलकर (कमिन्स इंडीया लि.कोथरुड), काळुराम पांडुरंग लांडगे (पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.कोथरुड),
कोल्हापूर – कु.नजमाबी गुलाब शेख (कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि. इचलकरंजी), दिनकर बापु आडसुळ (मेनन पिस्टन रिंग्ज प्रा.लि., कासारवाडी रोड, संभापूर, टोप, ता.हातकणंगले), विजय संभाजी आरेकर (एम.बी.रिसेलर्स, युनिट नं.3, एम.आय.डी.सी., कागल),
सोलापूर - नितीन रामदास बेनकर (सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना लि.शंकरनगर, अकलूज ता.माळशिरस), गजानन कृष्णाजी पिसे (सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना लि. शंकरनगर, अकलूज ता.माळशिरस), अशोक सु-याबा आलदर (म.रा.वि.वि.कंपनी मर्यादित, पंढरपूर),
सांगली - नितीन रामचंद्र पाटील (म.रा.मा.परिवहन महामंडळ, चंदनवाडी, मिरज), इम्रानअली रमजान शिकलगार (किर्लौस्कर ब्रदर्स लि. किर्लोस्करवाडी, ता.पलूस), श्री. बालाजी किसन नलवडे (किर्लौस्कर ब्रदर्स लि. किर्लोस्करवाडी, ता.पलूस),
सातारा - विठ्ठल सखाराम तांबे (गोदरेज ॲन्ड बॉईज, शिंदेवाडी, शिरवळ, ता.खंडाळा), संगीता धनंजय भोईटे (श्रीराम शेतकरी कामगार सहकारी ग्राहक संस्था मर्या. श्रीराम बाझार, ता.फलटण)
नाशिक - योगेश रावण कापडणीस (औष्णिक विद्युत केंद्र, एकलहरे), गणेश यशवंत काळे (करन्सी नोट प्रेस),संजीव आनंदा सुरवाडे (विद्युत इंजिन कारखाना, भुसावळ),
नागपूर – डॉ.स्मिता समीर माहुरकर (एल.आय.सी.आय. नागपूर मंडल, कार्यालय), लीलाधर रामेश्वरजी दवंडे (इंडोरामा सिंथेटीक्स (इं), लि. बुटीबोरी), पंकज गोवर्धनराव ठाकरे (ग्रांईटवेल नॉर्टन लि. बुटीबोरी), दिलीप विठ्ठलराव ठाकरे (मध्यवर्ती कारागृह मुद्रणालय, वर्धा रोड, निरी),
चंद्रपूर - संतोष मारोतराव ताजने (चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, ऊर्जा नगर, चंद्रपूर), बबन भिकाजी भारस्कर (महापारेषण, अडदा, बल्लारशाह), महानंदा भगवानराव केंद्रे (म.रा.मार्ग परिवहन महामंडळ, परभणी),
औरंगाबाद - सुरेश श्रीनाथराव बोर्डे (बजाज ॲटो लिमिटेड, बजाज नगर, वाळूज), श्रावण बबनराव कोळनूरकर (म.रा.वि.वि.कंपनी मर्यादित, चिकलठाणा), पंजाबराव गोंविदराव मोरे (प्रबोधन प्रकाश प्रा.लि. ), अरुण वैजनाथ भालेकर (कोहलर पावर इंडीया प्रा.लि. चिकलठाणा), सुर्यकांत बाबुराव पदकोंडे (बजाज ॲटो लिमिटेड, बजाज नगर, वाळूज),
उस्मानाबाद - कुलदीप जनार्दन सावंत (म.रा.मार्ग परिवहन महामंडळ, उस्मानाबाद),
अकोला – राजेशकुमार ओंकारमल राजोरे (विदर्भ पब्लिकेशन प्रा.लि.)
परभणी - विजय तुकाराम रणखांब (म.रा.वि.वि.कंपनी मर्यादित, विद्युत भवन कार्यालय)