पुणे : रांजणगाव MIDC औद्योगिक वसाहतीमधील ऐवरी डेनिसन इंडिया प्रा. लिमि. रांजणगाव, ता. शिरूर, जिल्हा- पुणे. (Avery Dennison India Pvt. Ltd.) कंपनी व्यवस्थापन आणि ऐवरी डेनिसन एम्प्लॉईज युनियन यांच्या मध्ये वेतन वाढीचा करार अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.
कराराची ठळक वैशिष्ट्ये :
सदर करार १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत एकूण चार वर्षांसाठी झाला.
प्रथम वर्ष ३५%,
द्वितीय वर्ष ३०%,
तृतीय वर्ष २५%,
चतुर्थ वर्ष १०% असा विभागण्यात आला.
१. सदर करार २००७ या बॅच साठी ४ वर्षांसाठी रु. २६,०००/- सरळ पगारवाढ.
२. २००८ ते २०१४ या बॅच साठी ४ वर्षांसाठी रु. २५,५००/- रुपये सरळ पगार वाढ.
३. २०१७ ते १९ या बॅच साठी ४ वर्षांसाठी रु. १८,७०० + रु. १६६६( परफॉर्मन्स बोनस) = रु. २०,३६६/- सरळ पगार वाढ.
याव्यतिरिक्त सीटीसी च्या बाहेर रु. २००/- प्रती नाईट असा नाईट शिफ्ट आलाऊन्स देण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले. ( सरासरी एका महिन्यात ९ नाईट शिफ्ट) ९×२००= रु. १८००/- प्रती महिना त्याचप्रमाणे,
परफॉर्मन्स बोनस प्रती वर्ष मार्च महिन्यात कंपनीच्या परफॉर्मन्स नुसार रु. २०,०००/- ( रु. २०,००० / १२ महिने = रु. १६६६/- महिना.)
२००७ बॅच साठी - २६०००+१८००= रु. २७,८००/-
२००८-२०१४ बॅच साठी- २५५००+१८००= रू. २७,३००/-
२०१७/१९- साठी १८७००+१८००+१६६६= रु. २२,१६६/-
१) ५ वर्ष सेवा कालावधी पूर्ण करणाऱ्या कामगारांसाठी पारितोषिक रक्कम रु.५०००/- वरून रु.७०००/--करण्यात आला आहे .
२) १० वर्ष सेवा कालावधीपूर्ण करणाऱ्या कामगारांसाठी पारितोषिक रक्कम रु.१०,०००/- वरून रु.१२,०००/- करण्यात आला आहे .
३) १५ वर्ष सेवा कालावधीपूर्ण करणाऱ्या कामगारांसाठी पारितोषिक रक्कम रु.२०,०००/-देण्यात येईल.
४) २० वर्ष सेवा कालावधीपूर्ण करणाऱ्या कामगारांसाठी पारितोषिक रक्कम रु.२५,०००/- देण्यात येईल.
५) २५ वर्ष सेवा कालावधीपूर्ण करणाऱ्या कामगारांसाठी पारितोषिक रक्कम रु.३०,०००/- देण्यात येईल.
हक्काची रजा : ८० दिवसापर्यंत साठवण्यात येणार आहेत . ८० दिवसाच्या पुढील हक्काच्या रजेचे रोखिकरण पगारानुसार केले जाईल .
आजारपणाची रजा (SL) : १० पुर्वी प्रमाणे असतील. परंतु कुठल्याही सभासदांचे मोठे ऑपरेशन, किंवा अपघात झाला तर आणि एखादी स्पेशल केस करण्याचे ठरल्यास, त्याच्या फक्त चालू वर्षीच्या शिल्लक राहिलेल्या SL वजा होतील व त्यांनंतर परीस्थिती पाहुन पुर्वपरंपरेनुसार स्पेशल लिव्ह देण्यात येईल .
खेळ : कामगारांसाठी भविष्यामध्ये खेळांना उत्तेजन देण्यासाठी दरवर्षी १ इनडोअर व १ आउटडोअर स्पर्धा भरविल्या जातील.
दिवाळी बोनस : कायद्यानुसार २०% देण्याचे मान्य.
२०२२ साठी = ७०० रुपये
२०२३ साठी = ८५० रुपये
२०२४ साठी = ९०० रुपये
२०२५ साठी = १००० रुपये
दिवाळी गिफ्ट कार्ड : पुर्वी दिवाळी गिफ्ट कार्ड ची रक्कम रु.७०००/- होती. त्यामध्ये वाढ करून रु.१०,०००/- करण्यात आली.
२०२३ साठी १३०० रुपये.
२०२५ साठी १४०० रुपये.
सदर करारावरती कंपनीच्या वतीने प्लँट हेड नवल भट्ट, एच.आर.हेड विनायक जाधव, इ एच मॅनेजर राहुल जगताप, प्रॉडक्शन मॉनेजर मनिंदर सिंह, एडमिन संकल्प हलगिकर तसेच संघटनेच्या वतीने अध्यक्ष आर अनिल, सचिव किशोर साबळे, सहसचिव चेतन येवले, अजित कुमार पांडा, उपाध्यक्ष अमित शिंदे, नितीन सुतार, खजिनदार नागेश कदम, कार्य सदस्य अमोल साळवे, अनिल तरटे यांनी सह्या केल्या.
तसेच हा करार संपन्न करण्यासाठी श्रमिक एकता महासंघा कडुन मारोतीराव जगदाळे, दिलीप पवार, शोत्री रोहित पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले अशी माहिती युनियन ने दिली. सदर करारामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून संघटनेच्या सातत्य प्रयत्नामुळे हे यश मिळाल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली.