घरेलु कामगार महिलांना "ई-श्रम कार्ड" वाटप करून जागतिक महिला दिन साजरा

पुणे : "जागतिक महिलादिना निमित्त" महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना पुणे जिल्हा यांच्या वतीने गुरुवार दि.१० मार्च रोजी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गिरिजाताई सिरशीकर (प्रशासकीय व्यवस्थापक स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठण), सोनालीताई परदेशी (संस्थापक अध्यक्ष कर्तव्य फौंडेशन), धनश्रीताई हिरनवाळे (सीए), महेक तोंडे (क्लार्क कामगार आयुक्त कार्यालय), राजश्रीताई गांधी (आयुर्वेदिक डॉक्टर) या कर्तुत्ववान महिलांचा सन्मान सुधीर गायकवाड सहाय्यक कामगार आयुक्त व संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, देऊन करण्यात आला.

       या कार्यक्रमात ई-श्रम कार्डचे घरेलु कामगार महिलांना वाटप करण्यातआले. तसेच असंघटीत कामगारासाठी असलेल्या  "प्रधानमंत्री श्रम योगी मानधन" योजने संबंधी सुधीर गायकवाड सहायक कामगार आयुक्त यांनी घरेलु कामगार महिलांना मार्गदर्शन केले व जास्तीत जास्त असंघटीत क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

   शरद पंडित यांनी आपल्या प्रास्ताविकात संघटना समाज उपयोगी अनेक उपक्रम राबवित असल्याची माहिती दिली व सत्कारमूर्ती महिलांचे अभिनंदन केले. सत्कारमूर्ती गिरिजाताई सिरशिकर, सोनालीताई परदेशी, धनश्री ताई हिरणावळे, राजश्रीताई गांधी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रदेश उपाध्यक्ष मीनाताई पंडित यांनी आपल्याभाषणात सत्कार मूर्ती महिलांच्या जिद्दीला आणि कार्याला सलाम केला. सूत्रसंचालन निराली जाधव यांनी केले. मान्यवरांचा परिचय काजल महाडेश्वर या कर्तव्य फौंडेशनच्या सदस्यांनी केले. आभार प्रदर्शन शहर अध्यक्ष स्वातीताई डिसुझा यांनी केले.

    या वेळी व्यासपीठावर महादेव कायंदे, भगवानराव देशपांडे, स्मिता कोरडे, सुवर्णा कोंढाळकर, स्वाती डिसुझा, उषा जाधव, सुनीता बढे, शिला तांदळे यांची  उपस्थिती होती. संध्या आदावडे, वर्षा ताडे, मिणाज शेख, सुजाता गुंजाळ, गीता भिलारे, मीनाक्षी बागुल, यशोदा साळवे, राजश्री महाडेश्वर, उषा मोहिते, स्मिता ननावरे, मंदाकिनी पवळे, सुहासिनी ओव्हाळ, वनिता इवारे, दिपाली सुतार, नसरीन शेख,वर्षा ठक्कर, जनाबाई कुडले, रुपाली घुले, अनिता पिसाळ, सुनीता राऊत, भाग्यश्री पासलकर आणि मोठ्या प्रमाणात सर्व कार्यकर्ते, सभासद उपस्थित होते.