पुणे : दि.१४ फेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना पुणे जिल्हा यांच्या वतीने श्री समर्थ मंडळ हॉल पुणे येथे प्रभू विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने घरेलु महिला कामगारांना ई- श्रम कार्डचे वाटप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सचिन राऊत, भगवानराव देशपांडे, सुदर्शनाताई त्रिगुनाईत यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान प्रभू विश्व कर्मा यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश उपाध्यक्ष मीनाताई पंडित होत्या त्यांनी भगवान प्रभू विश्वकर्मा विषयी अत्यंत मोलाची माहिती दिली. सचिन राऊत यांनी कामगार कल्याण सेवा सहयोग केंद्राच्या वतीने कामगारांना नि-शुल्क आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असे आश्वासन दिले,
भगवानराव देशपांडे यांनी मार्गदर्शन केले, कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुदर्शनाताई त्रिगुणाईत यांनी संघटनेच्या सभासद यांचे बचत गट स्थापन करावेत त्यांना शासकीय सुविधा मिळवून देण्याचे आश्वासन दिले तसेच त्यांनी सर्व घरेलु महिला कामगारांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद पंडित प्रदेश सरचिटणीस यांनी केले आभार प्रदर्शन उषा जाधव यांनी केले.
या प्रसंगी सुवर्णा कोंढाळकर, स्मिता कोरडे, शिला तांदळे, सुनीता बढे, संध्याआदावडे, वर्षा ताडे, स्वाती डिसुझा, मिणाझ शेख, उर्मिला भूमकर, सुजाता गुंजाळ, राजश्री महाडेश्वर, उषा मोहिते, जनाबाई कुडले, यशोदा साळवे, रुपाली घुले, वैशाली फाटे, मंगल पवार, सीमा चौहान इत्यादी पदाधिकारी व भाग प्रमुख, घरेलू कामगार महिलांची उपस्थिती होती.