बिडी कामगारांचा रोजगार संरक्षित करा - भारतीय मजदूर संघाची कामगार मंत्री कडे मागणी

नवी दिल्ली : अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) पदाधिकारी यांनी केंद्रीय  कामगार मंत्री श्री भूपेन्द्र यादव यांची 15 डिसेंबर 2021 रोजी श्रममंत्री यांच्या  दालनात नवी दिल्ली येथे भेट घेऊन  देशातील बिडी कामगारांना भेडसावत असलेल्या समस्यांबाबत लेखी निवेदन दिले. 

     किमान वेतन कायद्यानुसार राज्य सरकारांनी जाहीर केलेले किमान वेतन बिडी कामगारांना मिळत नाही म्हणून अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन सरकारने योग्य ते निर्देश द्यावेत तसेच कल्याणकारी योजना मिळण्या करिता लक्ष देणे आवश्यक आहे, योजनांचा लाभ व कायदेशीर सुविधा मिळण्यासाठी परिचय पत्र सर्व बिडी  कामगारांना देण्यात यावे, आरोग्याच्या सुविधां बाबत 2016 रोजी सरकारने ESIC कडे बिडी कामगारांना हस्तांतरित करण्याचा निर्णय त्वरित लागू करावा, तंबाखू प्रतिबंधक कायद्यामुळे विडी कामगारांना रोजगार मिळत नाही अशा परिस्थितीत वैकल्पिक रोजगार उपलब्ध होईपर्यंत रोजगार चालू ठेवण्यात यावा तसेच अन्य तंबाखू उत्पादनापासून बिडीला वेगळे करून वेगळा कायदा बनवण्यात यावा इत्यादी मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.

   भारतीय मजदूर संघांच्या शिष्टमंडळात असंगठीत क्षेत्राचे प्रभारी जयंतीलाल जी, बिडी महासंघाचे अध्यक्ष कलाल जी, महामंत्री उमेश विश्वाद तसेच कर्नाटक, तेलंगणा,बिहार, झारखंड, प. बंगाल, महाराष्ट्र असे आठ राज्यातील  प्रतिनिधी सहभागी होते. शिष्टमंडळाने माननीय कामगार मंत्री यांचे समोर बाजू मांडली तेव्हा कामगार मंत्री यांनी कामगारांचे मुलांना शैक्षणिक मदत व अन्य प्रश्नांबाबत लक्ष देवून सोडविण्याची बाबतीत आश्वासन दिले आहे.