वीज कंत्राटी कामगारांचे गाऱ्हाणे शिवसेना भवनावर

मुंबई : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या वतीने मंगळवार दिनांक 23 नोव्हेंबर 2021 रोजी मुंबई, दादर येथील शिवसेना भवन येथे शिवसेना उपनेते सचिन अहिर यांची भेट घेऊन राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांना भेडसावत असलेल्या समस्यांबाबत निवेदन देण्यात आले

     या वेळी आदित्य शिरोडकर, धुळे जळगाव नंदुरबार संपर्क प्रमुख .बबनराव थोरात, पुणे शहर संपर्क प्रमुख संजय मोरे व गजानन भाऊ थरकुडे उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष उमेश आनेराव, संघटन मंत्री राहुल बोडके, मुंबई व प्रकाशगडाचे अध्यक्ष सुनील कांबळे व श्रीकांत गमरे यांनी निवेदन दिले.

    राज्यभरातील वीज कंत्राटी कामगारांची काही कंत्राटदार व काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने वर्षानुवर्षे होणारी वेतन भविष्य निर्वाह निधी व अन्य कामगारांना देय असलेल्या शासकीय निधीची आर्थिक लूट थांबली पाहिजे आणि या करिता कंत्राटी कामगार पद्धती बंद करून महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या प्रयत्नातून रोजंदारी कामगार पद्धतीचा म्हणजेच NMR साठीचा जो अहवाल निर्माण झाला आहे, पूर्वाश्रमीच्या विद्युत मंडळाची NMR ही योजना पुन्हा चालू करणे शक्य आहे असे केल्यास राज्यातील या सर्व वीज कंत्राटी कामगारांना योग्य वेतनासह शाश्वत रोजगार म्हणजेच जॉब सिक्युरिटी मिळेल. या साठी NMR बाबत रानडे समितीच्या अहवालाची तातडीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे असे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. या समस्यां सोडवण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत लवकरच मिटिंग लावण्यात येईल असे आश्वासन सचिन अहिर यांनी संघटनेला दिले आहे

    शिवसेनेचे खासदार तथा दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक व सेना प्रवत्ते मा.संजयजी राऊत साहेब यांची देखील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली व पुष्पगुच्छ देण्यात आले.