चाकण : चाकण एम.आय.डि.सी. येथील टेनेको क्लिन एयर इंडिया प्रा.लिमि (Tenneco Clean Air India Pvt. Ltd.) कंपनी मधील व्यवस्थापन व टेनको एम्प्लॉईज युनियन यांच्या मध्ये चौथा वेतनवाढ करार दिनांक १ सप्टेंबर २०२१ रोजी संपन्न झाला.
वेतनवाढ कराराचा तपशील खालीलप्रमाणे :
सन जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२२ या तीन वर्षासाठी १८८३४/- इतकी पगारवाढ.
पाहिले वर्ष सन २०२० - ३५००/-
दूसरे वर्ष सन २०२१ - ५००० /-
तिसरे वर्ष सन २०२२ - १०३३४/-
दि.२०/९/२१ रोजी १००% फरक देण्याचे उभयपक्षी मान्य करण्यात आले.
पाडवा गिफ्ट :-
मध्ये मिळत असलेल्या १२,०००/- रकमेत वाढ करून ती २०,०००/- करण्यात आली आहे.
मेडिक्लेम :-
मेडिक्लेम या सुविधेमध्ये मिळत असलेल्या ०१ लाख रकमेत वाढ करून ती १,५०,०००/- इतकी करण्यात आली आहे तसेच रुमरेंट व नर्सिंग चार्जेस २५००/-प्रती दिवस
बफर :-
मिळणाऱ्या १० लाख रुपये या रकमेत वाढ करून ती १५ लाख इतकी करण्यात आली आहे
GPA :-
पॉलिसीमध्ये मिळण्याऱ्या ०४ लाख रुपये या रकमेत वाढ करून ती ०५ लाख इतकी करण्यात आली आहे.
सन २०२० = २८,६४८/-
सन २०२१ = २९,६४८/-
सन २०२२ = ३०,६४८/-
दसरा मिठाई :-
यामध्ये अर्धा किलो ऐवजी १ किलो मिठाई देण्यात येईल.
जर्किंग :-
कराराच्या कालावधीमध्ये एकदा टि शर्ट ऐवजी जर्किंग देण्यात येईल. तसेच EHS ची परवानगी मिळाल्यास सेफ्टी शूजचा लुक बदलण्यात येईल
मेडिकल टेस्ट :-
सध्या होत असलेल्या मेडिकल चेकअप मध्ये सर्वांचे ECG चेक करण्यात येईल.
डेथ रिलीफ फंड :-
यामध्ये कंपनी देत असलेल्या ७.५ लाख रुपये या रकमेत वाढ करून ती १२ लाख रुपये इतकी करण्यात आली . तसेच कामगारांचा सहभाग म्हणून दोन दिवसाचा पगार (एका महिन्यात एक ). अशी एकूण रक्कम सदर कामगाराच्या कायदेशीर वरसास ५० दिवसात देण्यात येईल.
नाईट शिप्ट आलाउन्स :-
चालू असलेल्या ५०/- रुपये या रकमेत वाढ करून ७५/- रुपये प्रत्येक रात्रपाळीसाठी देण्यात येईल .
फिजिकल फिटनेस ट्रेनिंग :-
या मध्ये जिवनशैली आजार (मधुमेह, रक्त दाब, ह्रदयचा आजार.) यावर ट्रेनिंग आयोजित केले जाईल. त्यासाठी सहभाग शुल्क ३०/- रुपये असेल.
ब्लॉक क्लोजर :-
एकुण ३० दिवसाचा ब्लॉक क्लोजर एका वर्षात घेतला जाऊ शकेल. त्यातील पहिले सहा दिवस व्यवस्थापनाकडून पुर्ण पगार दिला जाईल व उर्वरित २४ दिवसापैकी ५०% कामगार लिव्ह भरतील (१२ रजा ).
कंपनसेटरी ऑफ :-
काही कारणास्तव कंपनी बंद ठेवावी लागली अशा बंद ऐवजी पुढील ७० दिवसात साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी तो दिवस भरून घेतला जाईल.तसेच तो दिवस भरूण घेताना सलग दहा दिवस काम होणार नाही असाच दिवस भरुण घेतला जाईल.
कँटीन :-
तसेच सुधारणा स्वरूपात
A. चपाती कंपनीच्या आवारात बनवण्यात येईल.
B. आठवड्यात एकदा फ्रुट डिश.
C. महीन्यात एक दिवस स्पेशल जेवण*
D. पेड काउंटर प्रायोगिक तत्त्वावर चालू करण्यात येईल.
सेवेतील पारितोषिके :-
यामध्ये ज्या कामगारांना १३ वर्ष पूर्ण झाली आहे किंवा होतील (confirm date pasun pudhe) अश्या कामगारांना दर ५ वर्षांनी २ कपल मनगटी घड्याळ व मानचिन्ह वरिष्ठ व्यवस्थापणाकडून देण्यात येईल.
वाढदिवसानिमित्त भेटवस्तू :-
प्रत्येक कामगाराला वाढदिवसानिमित्त टेनकोचा लोगो असलेली भेटवस्तू देण्यात येईल.
करार वेळी कंपनी व्यवस्थापन यांच्या वतीने ऑपरेशन इंडिया डायरेक्टर श्री.दिगंबर पारखी, प्लॅन्ट हेड श्री.संजय आव्हाळे, प्लॅन्ट एच.आर श्री.तुषार पवार व टेनेको एम्प्लॉईज युनियन यांच्या वतीने अध्यक्ष संदिप दरेकर, उप.अध्यक्ष सत्यवान पानसरे व रोहिदास यादव, जनरल सेक्रेटरी तात्यासो भोसले, सह.सेक्रेटरी सुनिल मुुदुगडे, सह.सेक्रेटरी संपत जाधव, खजिनदार गणेश गुंजाळ हे उपस्थित होते.
हा वेतन करार संपन्न होण्यासाठी अतिमोलाचे मार्गदर्शन श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार श्री.मारुती जगदाळे, श्री.अरविंद श्रौती, श्री.दिलिप पवार, श्री.मनोज पाटिल, श्री.रोहित पवार, श्री.संतोष कणसे तसेच श्रमिक एकता महासंघाचे सर्व प्रतिनिधी यांनी केले.
