अगरवाल पॅकेजिंग प्रा. लि. (Agarwal Packaging Pvt. Ltd.) या कंपनीत वेतनवाढ करार संपन्न

चाकण : चाकण,खराबवाडी येथील अगरवाल पॅकेजिंग प्रा. लि. (Agarwal Packaging Pvt. Ltd.) या कंपनी मध्ये व्यवस्थापन व हिंद कामगार संघटना यांचे दरम्यान दि.30 ऑगस्ट 2021 रोजी वेतनवाढ करार संपन्न झाला.

वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे :

  • कराराचा कालावधी दि.1 सप्टेंबर 2020 ते दि.30 ऑगस्ट 2024 असा चार वर्षाचा आहे.

  • सर्व कामगारांना एकूण रु.11,000/- रुपये वेतनवाढ मिळणार असून पहिल्या वर्षी - 40%, दुसऱ्या वर्षी - 20%, तिसऱ्या वर्षी - 20%, चौथ्या वर्षी - 20% वेतन वाढ मिळणार आहे. एकूण वेतन वाढीमधील 50% बेसिक व 50% भत्ते यामध्ये देण्यात येणार आहे.

  • कामगारांना आज पर्यंतचा फरक मिळणार आहे.

  • महाराष्ट्र शासन दर सहामहिन्याला जाहीर करत असलेला बदलता महागाई भत्ता (Variable D.A.) 

      करारावरती व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे डायरेक्ट सतिशजी गुप्ता, एच आर मॅनेजर भरत गायतोंडे, कंपनीचे वकील ॲड. श्रीनिवास इनामती साहेब आणि हिंद कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष डॉ.कैलास कदम (कामगार नेते), संघटनेचे खजिनदार सचिन कदम कामगार प्रतिनिधी महादेव कड, हनुमंत मिंडे, लक्ष्मण बुट्टे, रोहिदास कर्पे, सुनिल मोहिते आदींनी सह्या केल्या आहेत. 

     कोरोनाच्या जागतिक महामारीत देशभर औद्योगिक आणि आर्थिक मंदी असताना हिंद कामगार संघटनेने अकरा हजार रुपयांची वेतनवाढ देणारा करार केला आहे. यामुळे कामगारांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व कामगारांनी या कराराबद्दल व्यवस्थापन व हिंद कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांचे आभार व्यक्त केले.