मरकळ,चाकण : मरकळ एमआयडीसी येथील कपारो इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड (Caparo Engineering India Pvt. Ltd.) या कंपनीमध्ये व्यवस्थापन व भारतीय कामगार सेना यांच्या दरम्यान दिनांक 28 ऑगस्ट 2021 रोजी वेतनवाढ करार संपन्न झाला.
वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :
- कराराचा कालावधी दि.1 एप्रिल 2021 ते दि.31 मार्च 2024 असा तीन वर्षाचा करार झाला.
- सर्व कामगारांना एकूण रुपये 10,082/- वेतनवाढ मिळणार असून
पहिला वर्षी - रुपये 3,025/-
दुसऱ्या वर्षी - रुपये 3,527/-
तिसऱ्या वर्षी - रुपये 3,530/-
या पद्धतीने वेतनवाढ मिळणार आहे एकूण वेतनवाढ मधील रक्कम 50% बेसिक आणि 50% इतर भत्ते
यामध्ये देण्यात येणार आहे.
- कामगारांना आजपर्यंतचा फरक मिळणार आहे.
- महाराष्ट्र शासन दर महिन्याला जाहीर करत असलेला बदलता महागाईभत्ता (Variable D.A.)
- रिलीफ फंड - कंपनी या मध्ये रुपये 18 लाख इतकी करण्यात आली तसेच कामगारांचा सहभाग म्हणून एक दिवसाचा पगार अशी एकूण रक्कम सदर कामगारांच्या कायदेशीर वारसास देण्यात येईल.
- इतर सवलती - यामध्ये एक भरपगारी सुट्टी, कंपनी युनिफॉर्म, एक जॅकेट, दोन टी-शर्ट, दोन अॅप्रोन, शूज देण्यात येणार आहे.
करारावरती व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे बिझनेस हेड सरोजजी साहू, प्रोडक्शन हेड पाठकजी, इंजिनिअरिंग हेड प्रेम सिन्हा, एच आर हेड आकाश कर्माकर, कामगार संघटनेच्या वतीने भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस, शिवसेना उपनेते, महाराष्ट्र राज्य किमान वेतन मंडळ सल्लागार अध्यक्ष डॉ. रघुनाथजी कुचिक, संघटनेचे युनिट अध्यक्ष विजय लोखंडे, उपाध्यक्ष संतोष कुंभार, सचिव गणेश भुसे, निलेश पाचपुते, अण्णा जुमले, रमेश झा यांनी सह्या केल्या.
कोरोनाच्या जागतिक महामारी व मंदी असतानाही वेतनवाढ करार झाल्यामुळे कामगारांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण असून सर्व कामगारांनी या करारा बद्दल कंपनी व्यवस्थापन, युनिट कमिटी व भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस, शिवसेना उपनेते डॉ.रघुनाथजी कुचिक यांचे आभार व्यक्त केले.
