बीडी कामगारांचे विविध प्रश्न, मागण्या बाबतीत केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांना निवेदन

नवी दिल्ली : अखिल भारतीय बीडी मजदूर महासंघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) च्या केंदीय पदाधिकारी यांनी देशातील 17 राज्यातील 80 लाख बिडी कामगांरांचे विविध प्रश्न, मागण्या बाबतीत केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या समावेत नुकतीच नवी दिल्ली येथे चर्चा करून बिडी कामगार, तंबाखू पिकवणारे शेतकरी यांच्या रोजगार सुरक्षित करून कामगारांना न्याय द्यावा अशी विनंती केली आहे. 

महासंघाच्या प्रमुख मागण्या :

  • 1) दि 1/09/2021 पासून EPFO च्या आदेशानुसार ज्या कामगारांचे रेकाॅड आधार कार्डाशी जुळत नसेल तर त्या कामगारांची खाते बंद होणार आहेत या बाबतीत जन्म दाखले, मॅरेज सर्टिफिकेटस, नावातील बदला बाबतीत गॅजेट इ. कागदपत्रे बिडी कामगारांकडे नसल्यामुळे हजारो कामगारांचे PF खाती बंद होवुन कामगारांना योजना व लाभां बाबतीत वंचित रहावे लागू शकते असे नमूद केले आहे. 

  • 2) भारतातील सर्व बिडी कामगारांना पीफ, इएसआयसी सक्ती ने लागु करून बिडी उद्योजक व ठेकेदारांना जीएसटी लागु करून बिडी कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा. 

  • 3) भारत सरकारच्या दि 17/03/2016 चा बिडी कामगारांना इएसआय लागू करण्या बाबतच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावा. 

  • 4) विविध राज्यातील किमान वेतन कायद्यानुसार वेतनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात यावेत. 

  • 5) बीडी कामगारांच्या रोजगार रक्षणासाठी बिडी उद्योगाला कोटपा (CIGARETTE AND OTHER TOBACCO PRODUCTS PREVENTION ACT) कायदा मधून वगळण्यात यावे.

         या बाबतीत केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी चर्चा मध्ये बिडी कामगारांना इएसआय अंतर्गत लाभ देण्यात येतील, बीडी कामगारांच्या पीफ खात्याशी आधार कार्ड नंबर जोडणी बाबतीतील समस्या विचारात घेऊन निराकरण करण्यात येईल, केवळ आधार नंबरशी माहिती जुळत नाही म्हणून पीफ खाते बंद होणार नाही याची काळजी घेतली जाईल, किमान वेतना बाबतीत राज्य शासना कडून अहवाल मागवून अंमलबजावणीतील अडचणी दुर करण्यात येईल, रोजगार रक्षणासाठी कामगार मंत्रालय आरोग्य मंत्रालयशी संर्पक साधून कामगारांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन भारतीय मजदूर संघ संघाच्या शिष्टमंडळ ला दिले आहे.

       या वेळी अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघाचे (संलग्न भारतीय मजदूर संघ) अध्यक्ष श्री निवास कलाल ( तेंलगाणा)  सरचिटणीस उमेश विस्वाद (पुणे, महाराष्ट्र) भारतीय मजदूर संघ राट्रीय संघटन मंत्री श्री बी सुरेंद्रन व क्षेत्रीय संघटन मंत्री श्री पवनकुमार उपस्थित होते.