बारामती : पुणे विभागा अंतर्गत बारामती येथे कामगार राज्य विमा महामंडळ (ESIC) शाखा कार्यालय चे उदघाटन प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल शिवाजीराव खटकाळे भाऊ, ESIC उपक्षेत्र कार्यालय पुण्याचे उपसंचालक हेमंत कुमार पांडे, बारामती ऍग्रो लि. सीओओ देबराज दास, टेक्स्टाईल पार्क सीईओ संकेश्वर, उप - निदेशक सुशीलकुमार श्यामकुवर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल प्रदेक्षाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे भाऊंनी ESIC पासुन मिळणाऱ्या सुविधा बद्दल मार्गदर्शन केले तसेच लवकरात लवकर ESIC हॉस्पिटल सुरू करण्यात यावे अशी आग्रहाची विनंती केली. या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करताना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, श्रम मंत्रालय भारत सरकार व हेमंत कुमार पांडेजी यांचे विशेष आभार मानले. तसेच हेमंत कुमार पांडे उप - निदेशक यांनी आपल्या मार्गदर्शनात लवकरात लवकर प्राथमिक व सेकंडरी डिस्पेन्सरी सुरू करण्याची ग्वाही दिली.
यावेळी श्रायबर डायनामिक्स डेअरीज एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नाना साहेब थोरात, IMD कामगार समन्वय संघ वालचंदनगर चे अध्यक्ष नंदकुमार गोंडगे, संघटक राहुल रणमोडे, ISMT Ltd बारामती युनियन चे अध्यक्ष कल्याण कदम, ज. सेक्रेटरी गुरुदेव सरोदे, फेरेरो इंडिया युनियन चे अध्यक्ष बाबासाहेब डेरे, डेप्युटी मॅनेजर वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड चे राहुल माने, श्री मिरगे, कामगार सेल चे मिडिया कॉडिनेटर अमोल गायकवाड, पियाजो व्हॅईकल बारामतीचे अभिषेक गालिंदे सर तसेच बारामती MIDC मधील विविध कंपन्यांचे व्यवस्थापकीय अधिकारी, संघटनांचे पदाधिकारी, कॉन्ट्रॅक्ट लेबर व ESI कार्यालयाचे अधिकारी व स्टाफ उपस्थित होते.
ESIC ब्रांच पत्ता :
पहिला मजला, आनंद बंगला, बालक मंदिर पाठिमागे, बारामती ता.बारामती जि.पुणे 413102
