श्रमजीवी कामगार संघटना अध्यक्ष पांडुरंग गायकवाड व सचिव सुधीर खैरे यांनी दिली माहिती
औरंगाबाद : औरंगाबाद कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत हे औरंगाबाद जिल्हा माथाडी मंडळाच्या अध्यक्ष पदांचे सूत्रे हाती घेतली तसेच विशेष सरकारी कामगार अधिकारी श्री जाधव यांची मंडळाच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मागील काही कालावधीपासून औरंगाबादच्या माथाडी मंडळ व सुरक्षा रक्षक मंडळ यांच्यासाठी पूर्णवेळ अध्यक्ष लाभत नसल्याने संघर्ष श्रमजीवी कामगार संघटनेने शासनाकडे वेळोवेळी मागणी करून माथाडी मंडळ व सुरक्षा रक्षक मंडळ यासाठी पूर्णवेळ सक्षम अधिकारी नियुक्त करावा असे निवेदन दिले होते. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यासाठी कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत हे रुजू झाले असून त्यांच्याकडे माथाडी मंडळ व सुरक्षा रक्षक मंडळ यांचे अध्यक्षपदही देण्यात आलेले आहे. त्यानंतर येथील सचिव रोहन रुमाले यांची बदली झाली असल्याने या ठिकाणी सचिव पदासाठी जागा रिक्त होती आता या जागेवर सचिव म्हणून श्री जाधव यांची शासनाने नियुक्ती केली आहे.
यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील माथाडी कामगार व सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांचे प्रश्न निकाली निघतील, मागील काही दिवसापासून माथाडी मंडळातील माथाडी कामगारांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत तसेच सुरक्षा रक्षकांचे देखील प्रश्न मोठ्या प्रमाणात प्रलंबित असून या मंडळामध्ये 2006 मध्ये भरती झालेले सुरक्षारक्षकांना अद्याप पर्यंत नियुक्ती मिळालेली नसून बरीच मोठी प्रतीक्षा यादी आहे ही यादी अद्यापर्यंत पूर्ण झालेली नाही याकडे वेळोवेळी संघर्ष जनरल श्रमजीवी कामगार संघटनेने पत्रव्यवहार करून अध्यक्षांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आत्ताच रुजू झालेले कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत यांनी आश्वासन दिले आहे की, येणाऱ्या काळामध्ये माथाडी मंडळ व सुरक्षा रक्षक मंडळ यांच्या कामांमध्ये मोठे फेरबदल झाल्याचे आपणास दिसून येईल तसेच सुरक्षा रक्षक यांची जी प्रतीक्षा यादी आहे ती लवकरच पूर्ण करण्यात येईल. या प्रतीक्षायादी मधील जे काही सुरक्षारक्षक राहिले आहेत त्यांना लवकरच नियुक्ती देण्यासंदर्भात पावले उचलले जातील व जास्तीत जास्त माथाडी कामगारांची नोंदणी या कार्यालयात करण्यासाठी निरीक्षकांवर जबाबदारी निश्चित केली जाईल. या अनुषंगाने श्री चव्हाण यांची औरंगाबाद औद्योगिक क्षेत्रासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, औरंगाबाद तालुका क्षेत्रातील कामासाठी श्री पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामुळे आत्ता सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार यांचे प्रश्न लवकरात लवकर निकाली निघतील अशी आशा कामगारांमध्ये निर्माण झालेली आहे.
यावेळी अध्यक्ष चंद्रकांत राऊत व सचिव जाधव यांनी सांगितले कि, औद्योगिक क्षेत्रांमधील कंपनी, गोडाऊन, लॉजिस्टिक तसेच ज्या ज्या ठिकाणी सामानाची चढ-उतार होते व ज्या ठिकाणी माथाडी स्वरूपाचे कामकाज चालते अशा मालक यांची लवकरात लवकर माथाडी मंडळांमध्ये मालक नोंदणी करून आपल्या इथे काम करणाऱ्या कामगारांची माथाडी मंडळात नोंदणी करावी. जर माथाडी मंडळातील नोंदणीकृत कामगारांच्या व्यतिरिक्त इतर कामगारांकडून जो कोणी मालक काम करून घेत असल्यास अशा मालकाविरुद्ध मंडळातर्फे कडक कारवाई करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील.
