कामगार कल्याण मंडळ व नील मेटल कंपनी यांच्या सहकार्याने स्वतंत्र दिनानिमित्त वृक्ष लागवड

चाकण : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र चाकण यांच्या वतीने व जे बी एम ग्रुपची नील मेटल कंपनीच्या (Neel Metal Products Limited) सहकार्याने स्वातंत्र्याच्या अमृत  महोत्सवी १५ ऑगस्ट निमित्ताने निल मेटल कंपनी आवारा मध्ये वृक्ष लागवड करण्यात आली.

यावेळी कंपनीचे डेप्युटी जनरल एच आर मॅनेजर संजय भसे, एच आर एक्झिक्युटीव्ह बाबासाहेब पठारे युनियन प्रतिनिधी नवनाथ नाईकनवरे व कामगार वर्ग उपस्थित होता.

     कामगार केंद्र संचालक अविनाश राऊत यांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व कामगार वर्गास सांगितले. डेप्युटी जनरल एच आर मॅनेजर संजय भिसे यांनी वृक्ष लागवड तसेच त्यांची संवर्धन करण्याबाबत सांगितले. केंद्र संचालक अविनाश राऊत यांनी सर्व मान्यवरांचे व कामगार वर्गाचे आभार मानण्यात आले कार्यक्रमास केंद्र सेवकराम रेटवडे, दत्तु आढारी व युनियन प्रतिनिधी संतोष पवार यांचे सहकार्य लाभले.