कंपनीच्या एकूण 23 हजार कर्मचाऱ्यांमध्ये 270.28 कोटी रुपये बोनस म्हणून वितरित केले जातील.
टाटा समूहाची स्टील उपकंपनी टाटा स्टील त्याच्या सर्व युनिटच्या कर्मचाऱ्यांना वार्षिक बोनस म्हणून एकूण 270.28 कोटी देईल. पीटीआयच्या वृत्तानुसार, 2020-2021 या आर्थिक वर्षासाठी वार्षिक बोनस भरण्यासाठी टाटा स्टील आणि टाटा वर्कर्स युनियन यांच्यात बुधवारी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली, असे कंपनीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
यानुसार, कंपनीच्या एकूण 23 हजार कर्मचाऱ्यांमध्ये 270.28 कोटी रुपये बोनस म्हणून वितरित केले जातील.
यामध्ये जमशेदपूर प्लांटसह ट्यूब विभागातील 12,558 कर्मचाऱ्यांना 158.31 कोटी रुपये मिळतील. यामध्ये किमान आणि कमाल वार्षिक बोनस अनुक्रमे, 34,920 आणि 3,59,029 असेल. त्याचवेळी, कलिंगनगर प्लांट, मार्केटिंग आणि सेल्स, नोआमुंडी, जमादोबा, झारिया आणि बोकारो खाणीतील 10,442 कर्मचाऱ्यांच्या खात्यात 111.97 कोटी रुपये जातील.
युनियनच्या वतीने अध्यक्ष संजीव चौधरी, उपाध्यक्ष शैलेश कुमार सिंह, सरचिटणीस सतीश कुमार सिंह यांच्यासह एमडी आणि सीईओ टीव्ही नरेंद्रन, उपाध्यक्ष (एचआरएम) अत्रेय सरकार आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोनस करारावर स्वाक्षरी केली.