कोल्हापूर : परिवर्तन संघटनेमार्फत दिनांक 19 जुलै 2021 रोजी देण्यात आलेल्या निवेदन वजा इशाऱ्याला प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन परिपत्रक जारी करून सर्व ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामसेवकांनी बांधकाम कामगारांना 90 दिवसांची प्रमाणपत्र देण्याबाबत आदेश काढले आहेत. सदर आदेशानुसार सर्व ग्रामसेवकांना बांधकाम कामगारांना 90 दिवसाचे प्रमाणपत्र देण्यास सर्व ग्रामसेवक बांधील राहतील सदर आंदोलन वजा इशाऱ्याला बांधकाम कामगारांच्या दृष्टीने खूप मोठे प्राप्त झाले असून इथून पुढे बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी कोणत्याही बांधकाम कामगारांचा वेळ वाया जाणार नसून खऱ्या अर्थाने परिवर्तन संघटनेला मिळालेले खूप मोठे यश आहे.
इमारत व इतर बांधकाम कामगारांची नोंदणी करताना बांधकाम कामगारांना त्यांनी मागील वर्षभरात 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे सदर 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र संबंधित बांधकाम कामगारांना त्याच्या नियोक्ता अथवा कंत्राटदारा मार्फत देण्यात येते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम नियम मधील नियम 33 (1) ( c) अन्वये बांधकाम कामगार एखाद्या बांधकामाच्या ठिकाणी सलग 90 दिवस काम करत आहे अशा सर्व कामगारांना महामंडळामध्ये नोंद होता यावे याकरिता ग्रामीण भागात ग्रामसेवक तसेच नगरपालिका व महानगपालिका करिता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकारी संबंधित बांधकाम कामगारांना 90 दिवसांची प्रमाणपत्र देण्याकरिता प्राधिकृत करण्याबाबत नमूद केले आहे त्यानुसार ग्रामविकास विभागाच्या संदर्भ क्रमांक 02 च्या दिनांक 22 सप्टेंबर 2017 शासन परिपत्रकाद्वारे ग्रामसेवकांना इमारत व इतर बांधकाम कामगारांना 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेले आहे.
बांधकाम कामगार संघटनांनी शासन व महामंडळा विरुद्ध माननीय उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली असून यामध्ये कामगारांना 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळत नसल्याबाबत नमूद केले आहे. तसेच काही जिल्ह्यातील बांधकाम कामगार कामगार संघटना व जिल्हा कार्यालयामार्फत प्राप्त प्रस्ताव निवेदनानुसार संबंधित ग्रामपंचायत ग्रामपंचायत ग्रामसेवक कडून असे प्रमाणपत्र नाकारले जात जाते अथवा बांधकाम कामगारांना कंत्राटदाराचे ठेकेदाराची प्रमाणपत्र सादर करणेबाबत सुचित करण्यात येते अथवा बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार असल्याचे शपथपत्र सादर करणेबाबत आग्रह केला जातो.
परिणामी ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र नोंदणी करू शकत नाहीत अधिनियमातील तरतुदीनुसार बांधकाम कामगारांची महामंडळाकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे मंडळाकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे मंडळाकडे नोंदीत बांधकाम बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळू शकतो. तसेच इमारत इमारत इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996 महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम नियम 2007 मधील तरतुदी तसेच ग्रामविकास विभागाच्या संदर्भ क्रमांक 02 च्या परिपत्रकामध्ये सूचनेनुसार ग्रामीण भागातील इमारत व इतर बांधकाम बांधकामावर काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी महामंडळाकडे करण्याकरता आवश्यक 90 दिवसांचे प्रमाणपत्र विहित नमुन्यात निर्गमित करण्याबाबत सर्व ग्रामसेवकांना आपल्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्याबाबत आदेश महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी 28 फेब्रुवारी 2021 काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी करून घेण्यास परिवर्तन संघटनेला खूप मोठे यश प्राप्त झाले आहे.
सदर निवेदन वजा इशारा देत असताना परिवर्तन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच राष्ट्रीय कामगार नेते संजय पाटील, अनिल कवाळे आणि शिष्टमंडळ संग्राम जाधव, अभिजीत सुतार, प्रकाश पवार, प्रकाश पाटील, रियाज जैनापुरे, उमेश कांबळे, वैभव चौगुले, सचिन माळी, सचिन दाभाडे हे उपस्थित होते.