पुणे : सायकल कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) च्या नाम फलकाचे अनावरण भारताच्या 75 व्वा स्वातंत्र्य दिन च्या निमित्ताने 15 ऑगस्ट रोजी पुणे महानगर पालिका नगरसेवक श्री विशाल धनवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे हे सायकली चे शहर म्हणून ओळखलं जातं, वर्षानु वर्षे उन्हात, पाऊसात रस्ताच्या कडेला बसून सायकल दुरूस्ती, जोडणी करणारे कामगारांनी जीवनात प्रगती व्हावी, स्थिरता यावी म्हणून भारतीय मजदूर संघाने पुढाकार घेऊन 1997 साली संघटना स्थापन केली. महाराष्ट्र सरकार ला सायकल ऊद्योगातील कामगारांना किमान वेतनाचा लाभ मिळण्यासाठी विविध स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर लाभ मिळाला.
सायकल कामगार हा असुरक्षिततेची भावना ,अनारोग्य वातावरणात जीवनाची वाटचाल आजही सुरू आहे. संघटनेच्या बोर्डाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम, जागृती निर्माण करण्याचे काम नामफलक करेल असे प्रतिपादन भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा पदाधिकारी सचिन मेंगाळे यांनी नमूद केले आहे.
केंद्र सरकारने असंघटीत कामगारांना करिता सामाजिक सुरक्षा कोड चे लाभ त्वरित लागु करण्यात येवून त्यांचे लाभ मिळावेत अशी मागणी केली आहे. या प्रसंगी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा पदाधिकारी श्री अभय वर्तक, अजेंद्र जोशी विशेष उपस्थित होते. या वेळी सायकल कामगार संघाचे पदाधिकारी प्रभाकर सुर्यवंशी, फरिद शेख , कैलास बारी , सूर्यकांत चव्हाण, हनुमंत पवार , स्वामी, सलीम शेख, बादशहा शेख उपस्थित होते.